आज १९१ ग्रामपंचायतींसाठी मतदान, निवडणूक, पोलीस यंत्रणा सज्ज : रायगड पोलीस शीघ्र कृती दल जवानांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:53 AM2017-10-16T06:53:50+5:302017-10-16T06:54:04+5:30

नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच देखील आता थेट मतदारांतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर प्रथमच होत असलेल्या रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ६१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड

 Today, elections for 191 Gram Panchayats, elections, ready for police machinery: Raigad Police Rapid Action Force jawans | आज १९१ ग्रामपंचायतींसाठी मतदान, निवडणूक, पोलीस यंत्रणा सज्ज : रायगड पोलीस शीघ्र कृती दल जवानांचे पथसंचलन

आज १९१ ग्रामपंचायतींसाठी मतदान, निवडणूक, पोलीस यंत्रणा सज्ज : रायगड पोलीस शीघ्र कृती दल जवानांचे पथसंचलन

Next

विशेष प्रतिनिधी/
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच देखील आता थेट मतदारांतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर प्रथमच होत असलेल्या रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ६१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड बिनविरोध झाली. ५४ ग्रामपंचायती पूर्णत: सरपंच व सदस्यासह बिनविरोध झाल्या आहेत. त्याचबरोबर २४२ ग्रामपंचायतींमध्ये ६३८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंच पदाच्या १७४ जागांसाठी ४५४ तर सदस्यपदाच्या १२८० जागांसाठी २६५७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित १९१ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी १६ आॅक्टोबर रोजी मतदान होत असून, त्याकरिता निवडणूक यंत्रणा व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ग्रामपंचायतींचे राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्र वारी खुला प्रचार थांबल्यावर, छुप्या प्रचाराला गती प्राप्त झाली होती. ग्रामस्तरीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच जागरूक मतदार विकासाच्या मुद्द्यावर थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याकरिता सज्ज झाला आहे. आताच्या निवडणूक टप्प्यात जिल्ह्यात २४२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. यापैकी ५४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता सोमवारी जिल्ह्यातील या १९१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. २४२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ८२७ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती. छाननीमध्ये ५ अर्ज बाद झाले होते तर ५ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २९७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्याचबरोबर ६१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवड बिनविरोध झाली असून, १७४ सरपंचपदासाठी ४५४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत.
जिल्ह्यातील महाड तालुक्यात सर्वाधिक २७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड बिनविरोध झाली असून, माणगावमध्ये ८, पोलादपूरमध्ये ७, श्रीवर्धन ६, पेण ४, म्हसळा तालुक्यात ३, सुधागड २ तर उरण, खालापूर, तळा आणि रोहा तालुक्यात प्रत्येकी एक अशा एकूण ६१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड बिनविरोध झाली आहे.
यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अधिकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या-त्या राजकीय पक्षाची निवडणूक चिन्हे दिली जात होती. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या नव्या धोरणानुसार सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी कपाट, कप-बशी, शिलाई मशिन, सिलिंग फॅन, रोडरोलर, अंगठी आदी निवडणूक चिन्हे असून, सदस्यपदांच्या उमेदवारांसाठी शिट्टी, इस्त्री, ग्लास, केटली, बॅट, जग, मेणबत्ती, टोपली, करवत, पाटी आदी निवडणूक चिन्हे आहेत. यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आपल्या उमेदवाराची मतदान निशाणी मतदारांच्या मनात उतरवण्याकरिता मोठे परिश्रम करावे लागले आहेत.
थेट जनतेकडूनच या वेळी सरपंच निवडला जाणार असल्याने मतदारांना या निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.

दुरंगी, तिरंगी लढती
च्जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींमधील ७६० प्रभागामध्ये १९५६ सदस्य संख्येसाठी ४२८८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये ९५१ सदस्यांनी माघार घेतली असून, ६३८ ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत.
च्७६० प्रभागांपैकी २९८ प्रभागांत उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर २ प्रभाग पूर्णत: रिक्त राहिले आहेत, त्यामुळे ५१५ प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे.
च्२४२ ग्रामपंचायतींमधील १९५६ सदस्यांपैकी ६१ सदस्यांच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. २४२ ग्रामपंचायतींमध्ये ५४ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या असून, १९१ ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती आहेत. त्यामुळे १२८० सदस्यांच्या जागांसाठी २६५७ उमेदवार रिंगणात उभे राहिलेले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात १६ आॅक्टोबरला सुटी
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका सोमवारी १६ आॅक्टोबर रोजी पार पडणार आहेत. त्याअनुषंगाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सोमवारी १६ आॅक्टोबर २०१७ रोजी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
निवडणूक होणाºया मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाºया क्षेत्राबाहेर कार्यरत मतदार असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतदानाकरिता सुटी वा सवलत देणे अनिवार्य
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्र ार आल्यास त्यांच्याविरु द्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी निवडणूक आदेशान्वये कळविले आहे.

कर्जत तालुक्यातील ६२ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात

कर्जत : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंचपदाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. सात सरपंचपदांसाठी १४, तर सात ग्रामपंचायतींच्या ६२ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात आहेत.

१तालुक्यातील कळंब, दहिवलीतर्फे वरेडी, वेणगाव, उक्रुळ, वावलोळी, मांडवणे आणि कोंडीवडे ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान होणार आहे. थेट सरपंचपदासाठी स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या आघाड्यांमध्ये सरळ लढत होत असून, सरपंचपदाच्या सात जागांसाठी १४ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. निवडणूक होत असलेल्या चार ग्रामपंचायतींमध्ये सध्या शिवसेनेचे सरपंच आहेत, तर अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच आहेत. त्यामुळे थेट सरपंच कुणाचे? आणि बहुमत कोणत्या आघाड्यांचे याबद्दल उत्सुकता दिसून येत आहे. दहिवली तर्फे वरेडीमधील तीन, वावलोळी ग्रामपंचायतीमधील तीन आणि कोंडीवडे ग्रामपंचायतीमधील एक, असे सात सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे सात ग्रामपंचायतींच्या एकूण ६९ जागांपैकी उर्वरित ६२ जागांसाठी १६ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.

२कळंब ग्रामपंचायतमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शेकाप-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची आघाडी झाली असून, शिवसेना-भाजपा हे पक्ष एकत्र आले आहेत. वावलोळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेविरु द्ध राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप यांची आघाडी झाली आहे, तेथे चार गावांत सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. वेणगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-भाजपा युतीविरु द्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत असून, सर्वसाधारण असलेल्या तेथील सरपंचपदासाठी दोन तरु णांमध्ये चुरशीची लढत होत आहे. उक्रुळमध्ये शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-काँग्रेस-भाजपा-आरपीआय या महाआघाडीने आव्हान निर्माण केले आहे. कोंडीवडे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-एसआरपी यांच्या आघाडी समोर शिवसेनेने आव्हान उभे केले आहे. मांडवणेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे.

Web Title:  Today, elections for 191 Gram Panchayats, elections, ready for police machinery: Raigad Police Rapid Action Force jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.