इंजिनिअरिंग प्रवेश आजपासून
By admin | Published: June 5, 2017 01:28 AM2017-06-05T01:28:18+5:302017-06-05T01:28:18+5:30
इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश- प्रक्रियेला आजपासून (सोमवार) सुरुवात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बारावी व एमएचटी-सीईटी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर, इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश- प्रक्रियेला आजपासून (सोमवार) सुरुवात होणार आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबविल्या जाणार असून, जागा शिल्लक राहिल्यास चौथी फेरी राबविली जाणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या वतीने राज्यभरातील सरकारी आणि खासगी इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाते. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुविधा केंद्र उभारण्यात आली आहे. या सुविधा केंद्रांमध्ये ५ जून ते १७ जून २०१७ मध्ये आॅनलाइन अर्ज भरून कागदपत्रांची पडताळणी करून घेता येणार आहे. त्यानंतर २२ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
कॅपची पहिली फेरी २२ ते २६ जून दरम्यान राबविली जाईल. त्यानंतर २८ जून पहिली अॅलॉटमेंट होईल. त्यानंतर सुविधा केंद्रांमध्येच २९ ते ३ जुलै दरम्यान प्रवेशनिश्चिती करता येणार आहे. कॅपची दुसरी फेरी ५ ते ८ जुलैदरम्यान पार पडणार आहे. दुसरी अॅलॉटमेंट १० जुलै रोजी जाहीर होईल, त्यानंतर ११ ते १४ जुलै दरम्यान प्रवेशनिश्चितीचा कार्यक्रम पार पडेल.
कॅपची तिसरी फेरी १६ ते १९ जुलै दरम्यान राबविली जाणार आहे. अॅलॉटमेंट २१ जुलै रोजी पार पडेल, त्यानंतर २२ ते २४ जुलै दरम्यान प्रवेश निश्चितीचा कार्यक्रम पार पडेल. सीईटीचा निकाल कमी लागल्याने प्रवेशाचा कटआॅफ खाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इंजिनिअरिंग प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २२ जून रोजी जाहीर होणार आहे, त्याच दिवशी राज्यभरात इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये किती जागा रिक्त आहेत, याची माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. इंजिनिअरिंगसाठी एमचटी-सीईटीची परीक्षा १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी दिली आहे.
>इंजिनिअरिंग प्रवेशप्रक्रियेचा कार्यक्रम
आॅनलाइन अर्ज भरणे व कागदपत्रे पडताळणी - ५ ते १७ जून
अंतिम गुणवत्ता यादी - २२ जून
कॅप पहिली फेरी - २२ ते २६ जून
पहिली अॅलॉटमेंट - २८ जून
प्रवेशनिश्चित - २९ जून ते ३ जुलै
कॅप दुसरी फेरी - ५ ते ८ जुलै
दुसरी अॅलॉटमेंट - १० जुलै
प्रवेश निश्चिती - ११ ते १४ जुलै
कॅपची तिसरी फेरी - १६ ते १९ जुलै
तिसरी अॅलॉटमेंट - २१ जुलै
प्रवेशनिश्चिती - २२ ते २४ जुलै