आज घटमांडणी; उद्या भविष्यवाणी

By admin | Published: May 9, 2016 02:15 AM2016-05-09T02:15:00+5:302016-05-09T02:15:00+5:30

भेंडवळची घटमांडणी ९ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी ६ वाजता केली जाणार.

Today; Forecast tomorrow | आज घटमांडणी; उद्या भविष्यवाणी

आज घटमांडणी; उद्या भविष्यवाणी

Next

जयदेव वानखडे /जळगाव जामोद (जि. बुलडाणा)
विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी ९ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी ६ वाजता केली जाणार आहे. घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज हे यावर्षीच्या पीक-पाण्याची भविष्यवाणी १0 मे रोजी पहाटे ६ वाजता जाहीर करतील. या घटमांडणीकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.
येत्या हंगामात पीकपरिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकटे, शत्रूंच्या कारवाया, राजाची गादी टिकणार काय, अशा सर्व प्रश्नांचे अंदाज काय राहतील, हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळला जमतात. भेंडवळच्या घटमांडणीला सुमारे तीनशे वर्षांंपेक्षाही जुनी परंपरा असून, चंद्रभान महाराज वाघ यांनी घटमांडणीची सुरुवात केली.
आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या, तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढय़ाच विश्‍वासाने जपली जात आहे, त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून असते.

Web Title: Today; Forecast tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.