मध्य रेल्वेवर आज चौथा विशेष मेगाब्लॉक
By admin | Published: October 23, 2016 07:59 AM2016-10-23T07:59:56+5:302016-10-23T07:59:56+5:30
दिवा स्थानकात जलद प्लॅटफॉर्मच्या कामानिमित्त मध्य रेल्वेवर आज चौथा ९ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - दिवा स्थानकात जलद प्लॅटफॉर्मच्या कामानिमित्त मध्य रेल्वेवर आज चौथा ९ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी ९ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. कल्याणहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.३३ ते १७.४५ पर्यंत कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर धावणार असून, त्या कल्याण-ठाणे दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.
सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.२९ ते १६.४५ पर्यंत ठाणे-कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर धावतील. त्यामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकमुळे सिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर रत्नागिरी-दादर-रत्नागिरी ट्रेन पनवेलपर्यंत धावणार आहे.
हार्बरवरही ब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान सकाळी ११.४0 ते ४.४0 पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान लोकल रद्द केल्या आहेत.