आज पेट्रोल पंप बंद
By admin | Published: August 11, 2014 12:58 AM2014-08-11T00:58:05+5:302014-08-11T00:58:05+5:30
पेट्रोल आणि डिझेलवर लादण्यात आलेले विविध कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विक्रेत्यांनी सोमवार, ११ आॅगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे नागपुरातील पंप
कंपनी संचालित पंप सुरू राहणार
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलवर लादण्यात आलेले विविध कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विक्रेत्यांनी सोमवार, ११ आॅगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे नागपुरातील पंप एक दिवसासाठी बंद राहतील, पण कंपनी संचालित पंप सुरू राहणार असल्याने वाहनचालकांची गैरसोय होणार नाही. वाहनचालकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल भरू नये, असे आवाहन विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केले आहे. अनावश्यक करांमुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल ६ रुपयांनी महाग आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. पेट्रोल व डिझेल करमुक्त करावे, कर कमी करण्याची विक्रेत्यांची मागणी आहे. बंदचे आवाहन महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केले आहे. या बंदला विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने समर्थन असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)