Narendra Modi: आज संकष्टी चतुर्थी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, नागपूरच्या टेकडी गणेशाला केलं नमन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 12:56 PM2022-12-11T12:56:16+5:302022-12-11T13:03:40+5:30

राज्यातील विविध प्रकल्पांच्या ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं.

Today is Sankashti Chaturthi PM Modi started his speech in Marathi bowed to Nagpur tekdi Ganesha | Narendra Modi: आज संकष्टी चतुर्थी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, नागपूरच्या टेकडी गणेशाला केलं नमन

Narendra Modi: आज संकष्टी चतुर्थी अन्...; PM मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात, नागपूरच्या टेकडी गणेशाला केलं नमन

Next

नागपूर-

राज्यातील विविध प्रकल्पांच्या ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं. मोदींनी यावेळी नागपूरकरांना संबोधित करताना आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि विशेषत: आजच्या संकष्टी चतुर्थीचा आवर्जुन उल्लेख केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. 

आम्ही मेहनत करणारे मंत्री, विकास हेच ध्येय अन् मोदींचाही खंबीर पाठिंबा: मुख्यमंत्री शिंदे

"आज संकष्टी चतुर्थी आहे आणि कोणतंही शुभकाम करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो. नागपुरात आज आहोत तर इथल्या टेकडी गणेशाला नमन करतो. गणपती बाप्पाला वंदन करतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आज खुला होत आहे याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

VIDEO: समृद्धी महामार्गाचं लोकार्पण अन् पंतप्रधान मोदींची CM शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप!

शिंदे-फडणवीस सरकार येताच कामांना गती
"महाराष्ट्रातील विकास कामांचं उदघाटन करताना आज मला आनंद होत आहे. शिंदे-फडणवीस सरकार येताच विकास कामांना गती प्राप्त झाली आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती प्राप्त झाली आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. कोणताही पायाभूत सुविधांचा प्रकल्प करताना त्याला ह्युमन टच गरजेचा असतो. समृद्धीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: Today is Sankashti Chaturthi PM Modi started his speech in Marathi bowed to Nagpur tekdi Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.