आजपासून ‘जलमित्र अभियान’
By admin | Published: May 8, 2016 04:02 AM2016-05-08T04:02:13+5:302016-05-08T07:39:34+5:30
सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत
‘लोकमत’चा जलसाक्षरतेसाठी पुढाकार : राज्यभर राबविणार मोहीम
मुंबई : सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानास रविवार दि. ८ मेपासून प्रारंभ होत आहे. सहा आठवड्यांच्या या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि देशातील ४० टक्के प्रदेशावर सध्या जलसंकट ओढावले आहे. या स्थितीत पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण समाजात आजवर यासंदर्भात नेमकेपणाने जागरुकता निर्माण केली गेली नाही. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलसाक्षरतेसाठी जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. सहा आठवड्यांच्या या अभियानात पहिल्या सप्ताहामध्ये ‘लोकमत’ च्या अंकात पाण्याचे महत्त्व आणि जलसाक्षरतेबाबत जनजागरण करणाऱ्या जाहिराती प्रसिद्धी करण्यात येणार आहेत. ‘लोकमत डॉट कॉम’ आणि सोशल मीडिया विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवरून जलबचतीसाठी जागृती करण्यात येईल. (प्रतिनिधी)
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी चर्चा
‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाच्या आयोजनासंदर्भात ‘लोकमत’चे संपादकीय मंडळ आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी समाजातील विविध स्तरातील लोकांशी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी चर्चा केली.
या साऱ्यांनी या अभियानाचे स्वागत केले. अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यभरात एकूणच या जलमित्र अभियानाबद्दल उत्सुकता दिसून आली.
सेलीब्रिटीजसह अभियान राबविणार
हॉटेल्स, रेस्टॉरंट,
कॅन्टीन आणि मेसमध्ये (खानावळ) ‘ग्लास आॅफ
वॉटर आॅन ग्राऊंड’ ही मोहीम राबविण्यात येईल. याशिवाय रुग्णालये, माहिती - तंत्रज्ञान कंपन्या, उत्पादन करणाऱ्या कंपन्या, मल्टिप्लेक्स् आणि मॉल्समध्येही जलमित्र अभियान राबविण्यात येणार आहे.
दुसऱ्या आठवड्यात वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर पोस्टर्स /स्लोगन्स् स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. तिसऱ्या आठवड्यात सोसायट्यांमध्ये
रेन वॉटर हार्वेस्टिंग स्पर्धा घेण्यात येईल. चौथ्या
आणि पाचव्या आठवड्यात देशातील सेलिब्रिटीज् या जलमित्र अभियानात सहभागी होतील. सेलिब्रिटीजसह
‘मी जलमित्र’अभियान राबविण्यात येईल़
जलसाक्षरतेसंदर्भात स्वाक्षरी मोहीम घेऊन जनतेच्या स्वाक्षरींची जंत्री मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. याशिवाय जनजागरणासाठी बॅचेस, मग, पाण्याच्या बाटल्या, टोप्या, टी - शर्टस् वाटण्यात येतील तसेच सोसायट्यांमध्ये स्टॅन्डीज् आणि पोस्टर्स लावण्यात येतील. ‘लोकमत’च्या माध्यमातून या मोहिमेचे फलित अखेरच्या सप्ताहात जाहीर करण्यात येणार आहे.