आज ‘लोकमत वॉटर समिट २०१७’

By admin | Published: July 11, 2017 06:17 AM2017-07-11T06:17:19+5:302017-07-11T06:17:19+5:30

लोकमत समूहा’तर्फे मंगळवार, ११ जुलै रोजी ‘लोकमत वॉटर समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले

Today, 'Lokmat Water Summit 2017' | आज ‘लोकमत वॉटर समिट २०१७’

आज ‘लोकमत वॉटर समिट २०१७’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत समूहा’तर्फे मंगळवार, ११ जुलै रोजी ‘लोकमत वॉटर समिट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन होणार आहे.अंधेरी पूर्वेकडील ‘आयटीसी मराठा’ येथे दुपारी १२.३० वाजता ‘वॉटर समिट’ला प्रारंभ होणार आहे. दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान समिटसाठी नोंदणी होईल. दुपारी १.३० वाजता समिटचे उद्घाटन होईल. जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
‘तरुण भारत संघा’चे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, राज्याचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
‘लोकमत’ मीडियाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन करतील. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता हे देखील या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. उद्घाटन सत्रानंतर राज्यभर जलसंधारणासाठी कार्यरत असलेल्या दिग्गजांचा गौरव होईल. त्यानंतरच्या सत्रात गिरीष महाजन, राम शिंदे, बबनराव लोणीकर यांना ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर बोलते करतील.
सत्र पहिले : ‘जलसंधारणातील सध्याची आव्हाने आणि शासनाचे प्रयत्न’ या विषयावरील चर्चेत राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ‘ड्रॉप डेड फाऊंडेशन’चे संस्थापक आबिद सुरती, ‘महिंद्रा ग्रुप’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर अनिरबन घोष, ‘गोवर्धन इको व्हिलेज’चे चीफ सस्टेनेबिलिटी आॅफिसर निमाई लीला दास आणि ‘युनिसेफ इंडिया’चे वॉश स्पेशलिस्ट युसूफ कबीर आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे सूत्रसंचालन ‘द ंिहंदू’ वृत्तपत्राचे निवासी संपादक सचिन कालबाग हे करतील.
सत्र दुसरे : ‘स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी : निरोगी जनतेसाठी आवश्यक’ या विषयावरील चर्चेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे संचालक डॉ. सतीश उम्रीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, ‘सिडको’चे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि ‘टेरी’चे सल्लागार जी.एस. गिल, ‘वॉटर फॉर पीपल’चे संचालक मीना नरुला आदी मान्यवर सहभागी होतील. या सत्राचे सूत्रसंचालन ‘सेफ्टी वॉटर उपक्रमा’च्या उपाध्यक्ष पूनम सेवक या करतील.
सत्र तिसरे : ‘पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी व्यावहारिक उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात राज्य सरकारच्या जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ ढवळे, ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष अमला रुईया, भाभा अणुसंशोधन केंद्राच्या विकास विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. आर.सी. बिंदल, ‘अंबुजा सिमेंट’च्या सीएसआरचे अध्यक्ष पिरल तिवारी, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवरांचा सहभाग असेल.
>मान्यवरांची उपस्थिती
जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश
महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन होणार आहे.
जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर हे या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
उद्घाटन सत्रानंतर जलसंधारणासाठी कार्यरत
असलेल्या राज्यातील दिग्गजांचा गौरव होईल.

Web Title: Today, 'Lokmat Water Summit 2017'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.