आज मा. शांता हुबळीकर यांची पुण्यतिथी

By Admin | Published: July 17, 2016 11:42 AM2016-07-17T11:42:13+5:302016-07-17T11:42:13+5:30

चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला.

Today is ma. Death anniversary of Shanta Hubalikar | आज मा. शांता हुबळीकर यांची पुण्यतिथी

आज मा. शांता हुबळीकर यांची पुण्यतिथी

googlenewsNext

संजीव वेलणकर 

जन्म :- १४ एप्रिल १९१४
चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला. वयाच्या सोळाव्या वर्षी काही कानडी नाटकात त्यांनी कामं केली व गायन देखील.पण त्यामध्ये उत्पन्न कमी असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन चित्रपटात अगदी छोटीशी भुमिका साकारली. 
 
याच दरम्यान कोल्हापूर सिनेटोनमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके ,'गंगावतरण' हा चित्रपट बनवत होते. त्या चित्रपटातही शांता हुबळीकरांनी ,गंगेची भुमिका केली व एका गाण्यासाठी गायन देखील केले होते. भालजी पेंढारकर यांच्या "कान्होपात्रा"या चित्रपटात शांताबाईंना सर्वप्रथम महत्वपूर्ण भूमिका मिळाली. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.
 
"कान्होपात्रातील"भूमिकेमुळेच शांताबाईंना प्रभात फिल्म कंपनीत "माझा मुलगा","माणूस" या दोन चित्रपटात नायिकेच्या भूमिका मिळाल्या. या दोन्ही चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक तर झालेच,पण त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली. "माणूस" चित्रपटातील "कशाला उद्याची बात" हे त्यांचे गाणे आजही श्रवणीय वाटते. दुर्गा खोटे निर्मित "सवंगडी" चित्रपटासाठीही शांता हुबळीकरांनी गाणी गायली. 
 
"प्रभात","घर की लाज","कुलकलंक","मालन", "घरगृहस्थी", "सौभाग्यवती भव:" इत्यादी हिंदी चित्रपटांत त्यांनी कामे केली व पुन्हा एकदा त्या मराठी चित्रपटांकडे वळल्या. विश्राम बेडेकर दिग्दर्शित"पहिला पाळणा" मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. मातृभाषा कानडी असूनही शांताबाईंनी फक्त एकाच कानडी चित्रपटात काम केले. चित्रपटाचे नाव होते "घरसंसार". फिल्मिस्तानच्या "सौभाग्यवती भव" या सिनेमात पहिल्यांदाच चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली. मा. शांता हुबळीकर यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा. शांता हुबळीकर यांना आदरांजली.

Web Title: Today is ma. Death anniversary of Shanta Hubalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.