आज महापालिका धूमशान, ८६ जागा, ६२८ उमेदवार
By admin | Published: February 20, 2017 08:36 PM2017-02-20T20:36:08+5:302017-02-20T20:36:08+5:30
आज महापालिका धूमशान, ८६ जागा, ६२८ उमेदवार
आज महापालिका धूमशान, ८६ जागा, ६२८ उमेदवार
अमरावती : महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार २१ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत प्रत्यक्ष मतदान होत आहे. एक जागा अविरोध झाल्याने उर्वरित ८६ जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी महापालिकेसह निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
महापालिका क्षेत्रातीेल ५,७२,६४८ मतदारांसाठी एकूण ७३५ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास मतदान केंद्राध्यक्षासह तीन मतदान अधिकारी, ईव्हीएम आणि संबंधित साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचते झाले आहे.
मंगळवारी महापालिकेच्या ८६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा जाहीर प्रचार १९ फेब्रुवारी सायंकाळी ५.३० वाजता संपुष्टात आला. महापालिकेचा सत्तासोपान चढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चढाओढ आहे. भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने २२ प्रभागातील ८६ जागांसाठी निवडणूक होत आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या यानिवडणुकीसाठी तब्बल ६२८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीची मतमोजणी येथिल विभागीय क्रीडा संकुलातील ईनडोअर स्टेडियममध्ये २३ फेब्रुवारीला होणार आहे. ७३५ मतदान केंद्रासाठी ८१९ पथके, ८०० कंट्रोल युनिट आणि ३२०० बॅलेट युनिट कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी मदन तांबेकर यांनी दिली. मतदान केंद्रावरील पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन निवडणूक अधिकारी, एक पोलीस शिपाई आणि आवश्यकतेनुसार एक शिपाई राहणार आहे. महापालिका निवडणुकीचे मुख्य निवडणूक निरीक्षक तथा अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक सोमवारीच महापालिकेत दाखल झाले असून ते मतमोजणीपर्यंत मुक्कामी राहणार आहेत.
‘सूतगिरणी’त सर्वाधिक बुथ
४२२ प्रभागांतील ८६ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ७३५ मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक ४४ मतदान केंद्र सूतगिरणी प्रभागात तर सर्वात कमी २४ मतदान केंद्र त्रिसदस्यीय एसआरपीएफ वडाळी या प्रभागात आहेत. त्या पाठोपाठ ४० मतदान केंद्र राजापेठ श्री संत कंवरराम प्रभागात कार्यान्वित करण्यात आले आहेत.
एकूण प्रभाग................२२
एकूण जागा.................८७
एकूण मतदार.....५,७२,६४८
पुरुष मतदार........२९५३१५
स्त्री मतदार..........२७७३०५
अन्य मतदार.................२८
मतदान केंद्र...............७३५
संवेदनशिल केंद्र..........१७०
उमेदवारांची संख्या.......६२८