आजपासून पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळा
By admin | Published: February 11, 2016 02:20 AM2016-02-11T02:20:18+5:302016-02-11T02:20:18+5:30
तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंचीच्या विशालकाय मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व पंचकल्याणक महामस्तकाभिषेक
नाशिक : तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंचीच्या विशालकाय मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळ््याला गुरुवारी सकाळी दहा वाजता ध्वजारोहणाने प्रारंभ होईल. सोहळ््यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे.
सटाणा तालुक्यातील मांगीतुंगी पर्वतावरील मांगीगिरी शिखरावर चौदा वर्षांपासून भगवान ऋषभदेव यांची १०८ फुटी अखंड मूर्ती पाषाणात कोरण्याचे काम सुरू होते. हे ठिकाण जागतिक दर्जाचे तीर्थस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे या सोहळ््याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक सोहळ््याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांचे आगमन सुरू झाले आहे.