आज भांडतोय, उद्याचे सांगू शकत नाही: भंडारी
By admin | Published: February 11, 2017 01:55 AM2017-02-11T01:55:56+5:302017-02-11T01:55:56+5:30
शिवसेना-भाजपाचे भांडण हे आतापुरतेच आहे. उद्या मात्र काय होईल, हे आताच सांगू शकत नसल्याचे सांगून भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले
ठाणे : शिवसेना-भाजपाचे भांडण हे आतापुरतेच आहे. उद्या मात्र काय होईल, हे आताच सांगू शकत नसल्याचे सांगून भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत दिले.
शिवसेनेच्यावतीने सध्या भाजपाला गुंडांचा पक्ष म्हणून हिणवले जात आहे. भंडारी यांनी त्याची परतफेड करत शिवसेनेवर आरोपांची सरबत्ती केली. ते म्हणाले, ठाण्यात शिवसेनेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले २० उमेदवार दिले आहेत. दरम्यान, आता तुम्ही भांडत आहात. उद्या कल्याण-डोंबिवलीप्रमाणे सत्तेसाठी एकत्र येणार का, असा सवाल त्यांना केला असता, त्यांनी आमचे भांडण हे आतापुरतेच आहे. आज आम्ही विरोधात बोलत असलो तरी उद्या बोलू की नाही, याबाबत मात्र त्यांनी गुप्तता बाळगली.