आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार

By Admin | Published: August 19, 2016 01:13 AM2016-08-19T01:13:30+5:302016-08-19T01:13:30+5:30

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून १९ आॅगस्टपासून प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा आणि विषय

From today, the registration form can be filled | आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार

आजपासून प्रवेश अर्ज भरता येणार

googlenewsNext

मुंबई : अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून १९ आॅगस्टपासून प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा आणि विषय यात बदल करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना या विशेष यादीत बदलाची संधी मिळणार आहे. सोबत ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावीला प्रवेश घेतलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनाही या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे.
पहिल्या विशेष यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट प्रवेश अर्ज भरले होते, त्यांना दुसऱ्या विशेष यादीसाठी नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याउलट पहिल्या विशेष यादीअखेर नाखूश असलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार आहे. मंगळवारपासून लॉगइन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवर लॉगइन आयडी, पासवर्डसह प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरावा लागेल. २० आॅगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
दुसऱ्या विशेष यादीची गुणवत्ता यादी २३ आॅगस्टला जाहीर होणार आहे. जे विद्यार्थी प्रवेशामुळे संतुष्ट नसतील, त्यांनी रिक्त जागांची माहिती घेऊनच अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय पसंतीक्रम अर्ज भरताना अडचण असल्यास मार्गदर्शन केंद्रांची मदत घ्यावी, असेही प्रशासनाने सांगितले.

६०% पेक्षा कमी गुण मिळवलेल्या म्हणजेच फर्स्ट क्लास नसलेल्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांची नावे भरण्याची अट आहे.

Web Title: From today, the registration form can be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.