आज ठाण्यात पाणी नाही

By admin | Published: April 26, 2016 02:31 AM2016-04-26T02:31:25+5:302016-04-26T02:31:25+5:30

स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे.

Today there is no water in Thane | आज ठाण्यात पाणी नाही

आज ठाण्यात पाणी नाही

Next

ठाणे : स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहरास होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत बंद राहणार आहे. तर, एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सायंकाळी ६ ते शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतू पार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी आदी परिसरांत पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे. रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तर, बुधवारी सकाळी ९ ते गुरु वारी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today there is no water in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.