आजपासून जव्हारला उरूस
By admin | Published: September 21, 2016 03:40 AM2016-09-21T03:40:33+5:302016-09-21T03:40:33+5:30
औलीया पिरशहा सदरूद्दीन बदरूद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांच्या ५६४ व्या उरूस बुधवारी सुरू होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे
जव्हार - जव्हारचा शेकडो वर्षाची परंपरा असलेला हिंदु-मुस्लिम समाजाच श्रद्धा स्थान असलेला औलीया पिरशहा सदरूद्दीन बदरूद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांच्या ५६४ व्या उरूस बुधवारी सुरू होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
ठिकठिकाणी दर्गाह रोडवर दुकाने लागली असून एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर विविध पाळणे व इतर दुकाने लागली आहेत. एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर पावसामुळे नेहमी चिखल होत असे, त्यामुळे उरूसात येणाऱ्या लोकांना खुपच त्रास होत होता.मागील वर्षी ग्राउंड व रस्ता व इतर व्यवस्था नगर पालिकेकडून चांगल्या प्रकारे करण्यात आली होती. मात्र यंदाच्या पावसात ग्राउंडवर पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी डबके व गवत मोठया प्रमाणात होते. त्यामुळे उरूस जलसा कमेटीचे अध्यक्ष मोहसिन चाबुकस्वार यांनी याबाबत नगर पालिकेला विनंती करून लवकरात लवकर ग्राऊंड व रस्ता तयार करून खडी व माती मुरूमाचा भराव करण्यास सांगितले होते, त्यामुळे नगराध्यक्ष संदिपवैद्य आणी पालिकेचे मुख्याधिकारी वैभव विधाते व अभियंता बी. डी. क्षीरसागर यांनी तातडीने मजूर लावून संपूर्ण ग्राऊंड स्वच्छ करून माती व मुरूमचा भराव घालून रस्ता तयार करून ग्राऊंड स्वच्छ केले. याशिवाय उरूस परिसरात दिव्यांचीही पुरेशी सोय करण्यात आल्याने तो उजळून निघाला आहे. (वार्ताहर)
>मानले आभार
यंदाच्या उरूसामध्ये पाऊस आला तरी ग्राऊंड मध्ये चिखल होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आलेली असल्याचे पालिकेचे अभियंता बी. डी. क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच उरूस जलसा कमेटी व सुन्नी मुस्लिम मशिद मार्केट ट्रस्ट यांनीही पालिकेचे आभार मानले. तसेच ग्रामस्थांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.