‘रन फॉर युनिटी’मुळे आज दक्षिण मुंबईत वाहतुकीत बदल
By admin | Published: October 31, 2016 02:09 AM2016-10-31T02:09:47+5:302016-10-31T02:09:47+5:30
३१ आॅक्टोबर रोजी मरिन ड्राइव्ह येथील हॉटेल ट्रायडंट ते ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखानापर्यंत ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
मुंबई : ३१ आॅक्टोबर रोजी मरिन ड्राइव्ह येथील हॉटेल ट्रायडंट ते ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखानापर्यंत ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी ६ ते १0 वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. येथे वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला असून वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>या ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध
विधानभवन पार्किंग, एन.सी.पी.ए समोरील बाजूस, मरिन ड्राइव्ह जिमखाना, एल.आय.सी सर्कल आणि मंत्रालय पार्किंग लॉट
>हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील
एन.एस.रोड एन.सी.पी.ए. ते डी.टाटा रोड ते मफतलाल बाथ सिग्नलपर्यंत दोन्ही मार्ग
मादाम कामा रोड (उत्तर वाहिनी)-मंत्रालय जक्शन ते एअर इंडिया जक्शन
जमनालाल बजाज मार्ग आणि विनय के.शाह मार्ग ते वाल्मिकी चौक जक्शन.
दिनशॉ वाच्छा रोड (उत्तर वाहिनी)-जे.टाटा रोड सर्कल ते हॉटेल मरिन प्लाझा.
वीर नरिमन रोड (उत्तर वाहिनी)- चर्चगेट जक्शन ते सुंदर महल जक्शन.
प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर उत्तर वाहिनीवरुन एन.एस.रोडकडे जाणारी वाहतूक
विनोली चौपाटी ते मफतलाल बाथ सिग्नलपर्यंत दक्षिण वाहिनीवरून एन.एस.रोडकडे जाणारी वाहतूक
सर्व प्रकारच्या वाहनांना उभे राहण्यास प्रतिबंध
एन.एस.रोड- एन.सी.पी.ए ते डी.टाटा रोड ते मफतलाल बाथ सिग्नलपर्यंत दोन्ही मार्गावर
वीर नरिमन रोड- सुंदर महल जक्शन ते चर्चगेट जक्शन
मादाम कामा रोड- मंत्रालय जक्शन ते एअर इंडिया जक्शन.