मुंबईतल्या 'या' स्थानकांवर आजपासून वाय-फाय सुविधा
By admin | Published: August 22, 2016 12:55 PM2016-08-22T12:55:40+5:302016-08-22T12:55:40+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर अनेक सोयीसुविधांचा वर्षाव केला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबईचे उपनगरीय रेल्वे प्रवासी वारंवार कोलमडणा-या लोकलसेवेने त्रस्त असताना, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर अनेक सोयीसुविधांचा वर्षाव केला. यात महत्वाची आठ स्थानकांवर वायफाय सुविधा सुरु झाली आहे.
कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर (मध्य रेल्वे), दादर (पश्चिम), वान्द्रे टर्मिनस, चर्चगेट,वान्द्रे (लोकल), खार रोड स्थानकात वायफाय सुविधा सुरु झाली आहे.
आणखी वाचा
मुंबईत लोकलची परिस्थिती बिकट असून, प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मुंबईत एलीवेटेड प्रॉजेक्ट करण्यावर भर दिला असून लवकरच प्रकल्प मार्गी लागेल. हा प्रकल्प १५ वर्षापूर्वीच झाला पाहिजे होता. मात्र त्याला आता उशीर झाला आहे. तरीही प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी मुंबईत रेल्वेच्या एका कार्यक्रमात दिली.
मध्य आणि पश्चिम रेलवे वरील अनेक सोयीसुविधांचे उदघाटन त्यांच्या हस्ते दादर येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयत्न असून त्यासंदर्भात लवकरच शासनासोबत बैठक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.