‘श्रीं’चा आज १३९ वा प्रकटदिनोत्सव
By Admin | Published: February 18, 2017 03:14 AM2017-02-18T03:14:38+5:302017-02-18T03:14:38+5:30
भाविकांच्या सुविधेसाठी जय्यत तयारी; शेगावात दिंड्यांचे आगमन
शेगाव, दि. १७- श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने 'श्रीं'चा १३९ वा प्रकट दिनोत्सव १८ फेब्रुवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव व उत्साही वातावरणात साजरा होत आहे.
या प्रकटदिनोत्सवाला ११ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली, असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत. १८ फेब्रुवारी रोजी हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे सकाळी १0 ते १२ ह्यशेगावी श्रींच्या प्रागट्याह्ण निमित्त कीर्तन होईल. तर सकाळी १0 वाजता यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान होईल. दुपारी २ वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्वासह नगर परिक्रमा निघेल तसेच १८ रोजी हभप जगन्नाथबुवा म्हस्के यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे कीर्तन होईल.
६६२ दिंड्यांचे आगमन !
या उत्सवादरम्यान १७ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंंत ६६२ दिंड्यांचे आगमन झाले होते. हा आकडा रात्रीपर्यंंत वाढून एक हजारच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सहभागी होणार्या नवीन दिंड्यांना नियमाची पूर्तता केल्यावर १0 टाळ, विणा, मृदंग, हातोडी, ६ पताका, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ग्रंथ, तुकाराम गाथा असे संत साहित्य संस्थानच्यावतीने वाटप केल्या जात आहे.