हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा आज स्मृतिदिन

By admin | Published: September 16, 2016 11:25 AM2016-09-16T11:25:42+5:302016-09-16T11:25:42+5:30

हेमंत कुमार हे एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार व निर्माताहोते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार या नावाने प्रसिद्ध होते.

Today's Memorial Day by Hemant Kumar Mukhopadhyay | हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा आज स्मृतिदिन

हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा आज स्मृतिदिन

Next
>संकलन : प्रफुल्ल गायकवाड
पुणे, दि. 16 - हेमंत कुमार (१६ जून इ.स.१९२०-१६ सप्टेंबर इ.स. १९८९) हे एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार व निर्माताहोते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार या नावाने प्रसिद्ध होते.
 
जन्म आणि बालपणीचा काळ
हेमंतदांचा जन्म १६ जून १९२० ह्या दिवशी वाराणसी येथे झाला. त्यांचेबालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्याकाळी खेड्यात होतअसलेली नाटके पहात आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले, पणसंगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतदांना मिळाले नाही. त्यांचाकुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथीलमहाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवरगाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवरगायला पात्र झाले.
 
गायनात गती असणाऱ्या हेमंतदांना साहित्यक्षेत्रातदेखिल रस होता.१९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणेह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदांमधील कलाकार जन्मासआला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणालारामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्याससुरुवात केली.
 
गायक आणि संगीतकार
१९४० साली 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर १९४४साठी 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन हेमंतदांचाचित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. पैकी बंगालीचित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यकसंगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले. स्वतंत्र संगीतकारम्हणून त्यांनी १९४५ सालच्या पूर्बोरंग ह्या बंगाली तर १९५२ सालच्याआनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले.
 
१९५४ सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीतदिग्दर्शित केलेले त्यांचीगाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्टसंगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंतदांनीहिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्यासंगीतकारांकडे गाणी गाईली.
 
निर्माता
१९५९ साली हेमंतदांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्याचित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजलीप्रॉडक्शन्स ह्या चित्रपटकंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद (१९६२),कोहरा (१९६४), खामोशी (१९६९) ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतीलगाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाचीजबाबदारीदेखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
 
मराठी गाणी
हेमंतदांनी गाईलेली मोजकी मराठी गाणी लोकप्रिय झाली. ’हा खेळसावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ’गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, लतामंगेशकर ह्यांच्याबरोबरचे ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ हीहेमंतदांच्या लोकप्रिय मराठी गाण्यांची काही उदाहरणे आहेत.
 
पुरस्कार आणि सन्मान
१९५४ फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीतकार
१९७० निमंत्रण चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपटपुरस्कार (चित्रपट निर्माता)
१९८४ ललान फकिर चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९८५ साली रविंद्र भारती विश्वविद्यालयाची डि. लिट. ही पदवी
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Today's Memorial Day by Hemant Kumar Mukhopadhyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.