शिक्षक आमदारकीसाठी आज मतदान

By admin | Published: February 3, 2017 02:09 AM2017-02-03T02:09:07+5:302017-02-03T02:09:07+5:30

कोकणच्या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या शिक्षक आमदारकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि

Today's poll for the teachers' MLAs | शिक्षक आमदारकीसाठी आज मतदान

शिक्षक आमदारकीसाठी आज मतदान

Next

ठाणे : कोकणच्या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या शिक्षक आमदारकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी ९८ मतदान केंदे्र आहेत. सेके्रट हार्ट हायस्कूल, सेक्टर ४, वाशी येथे ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे.
या मतदानाद्वारे निवडून येणारे आमदार सहा वर्षांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचे नेतृत्व करणार आहेत. १० उमेदवारांपैकी एका योग्य उमेदवाराची निवड या वेळी मतदार करणार आहेत. ९८ पैकी ठाणे
जिल्ह्यात २१ मतदान केंद्रांवर १५ हजार ७३६ मतदार मतदान करणार आहेत.
याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील २८ मतदान केंद्रांवर १० हजार नऊ मतदारांची व्यवस्था आहे. पालघर जिल्ह्याच्या १३ केंद्रांवर पाच हजार ११५ मतदार, रत्नागिरीच्या १७ केंद्रांवर चार हजार ३२८ मतदार आणि सिंधुदुर्गच्या १९ केंद्रांवर दोन
हजार ४५६ मतदार मतदान करणार आहेत.
त्याचप्रमाणे, या वेळी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या संघटना व नावासमोर त्या उमेदवाराचे छायाचित्र असणार आहे. यामुळे योग्य उमेदवाराला मतदान करणे मतदारांना शक्य होणार आहे.
अंबरनाथ येथील तहसील कार्यालय आणि संजय गांधी ब्रँच हॉल, पहिला मजला येथे मतदान केंद्र आहे. याप्रमाणेच भिवंडी पोलीस कल्याण संकुल हॉल १ व २, सेतू केंद्राजवळ आणि प्री - प्रायमरी विद्यामंदिर मराठी जि.प. शाळा, वज्रेश्वरी येथे देखील केंद्र आहे.
कल्याण येथील सेंट्रल रेल्वे ज्युनिअर कॉलेज, मुरबाड रोड
कल्याण येथेही मतदान केंद्र
असून डोंबिवली परिसरातील साउथ इंडियन हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोपर रोड, शास्त्रीनगर रूम नंबर १, २ येथे मतदान केंद्र आहेत. (प्रतिनिधी)

या ठिकाणीही आहेत केंद्रे
- मुरबाडच्या तहसील कार्यालयात मतदान केंद्र असून शहापूर तहसील कार्यालय व जि.प. शाळा, शेणवे या ठिकाणी मतदान केंद्र आहे. ठाणे येथे तलाठी कार्यालय, पाचपाखाडी नौपाडा, ठाणे तहसीलदार कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, ठाणे तहसील कार्यालय आवार येथे केंद्र आहेत. भार्इंदरच्या सेकंडरी स्कूल, तर नवी मुंबईच्या तुर्भे येथील नवी मुंबई म्युनिसिपल स्कूल, सेक्टर २४ आणि उल्हासनगर येथे रूम नंबर ३६, न्यू इरा हायस्कूलमध्ये मतदान केंदे्र आहेत.

Web Title: Today's poll for the teachers' MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.