भाजपात उमेदवारीवरून आज पुन्हा घमासान

By admin | Published: February 1, 2017 02:13 PM2017-02-01T14:13:40+5:302017-02-01T14:13:40+5:30

पक्षाचे आमदार आणि काही प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे भाजपाची यादी रखडली.

Today's rejection of BJP candidate | भाजपात उमेदवारीवरून आज पुन्हा घमासान

भाजपात उमेदवारीवरून आज पुन्हा घमासान

Next

नाशिक : पक्षाचे आमदार आणि काही प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे भाजपाची यादी रखडली. त्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जळगावला लावे लागल्याने या पक्षाची उमेदवारी रखडली असून, अद्याप उमेदवारच घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणराय कोणालाच पावला नाही. आता बुधवारी महाजन यांच्या उपस्थितीत पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून, त्या उमेदवारीवरून घमासान रंगण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वतीने बुधवारीच पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातर्फे अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे.
भाजपाच्या उमेदवारीसाठी सुमारे सातशे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर २७ तारखेला पहिली यादी घोषित होईल, असे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले होते, मात्र अद्याप यादी घोषित नाही. यादीसंदर्भात सोमवारी रात्री पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक महाजन यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिटी सेंटर मॉल परिसरातील एका ठिकाणी घेण्यात आली. त्यात सर्वच पदाधिकारी आपापल्या समर्थकांसाठी अडून राहिल्याने कोणताही निर्णय होऊ शकला नाही. काही ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यमान नगरसेवक किंवा अन्य दावेदारांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप तसेच अन्य काही आमदारांनी शब्द दिले असून, अशावेळी उमेदवारीसाठी स्पर्धा वाढल्याचे वृत्त आहे. पंचवटीतील प्रभागात प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल उमेदवारी करीत असून, त्या प्रभागात दामोदर मानकर यांना उमेदवारीसाठी सानप यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. मात्र मखमलाबाद येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेट देऊन गावातील वेगळा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. त्यातून पेच निर्माण झाला आहे. पंचवटीत उत्तम उगले आणि जगदीश पाटील यांच्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. सिडको- सातपूर विभागात तर आमदार सीमा हिरे आणि आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे.

Web Title: Today's rejection of BJP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.