आज शाळेचा पहिला दिवस; फुलं-चॉकलेट देऊन मुलांचं स्वागत
By admin | Published: June 15, 2017 11:33 AM2017-06-15T11:33:24+5:302017-06-15T11:39:49+5:30
ज्यातील अनेक शाळांनी आज मुलांना फुलं आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15- उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्यांनंतर आज राज्यभरातील शाळा सुरू होत आहेत. पहिल्या बालवाडीत प्रवेश घेतलेल्या मुलांचा आज शाळेचा पहिलाच दिवस आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांचा दिवस छान जावा, दिवसाची सुरूवात गोड व्हावी आणि मुलांना शाळेत यायची गोडी लागावी यासाठी राज्यातील अनेक शाळांनी आज मुलांना फुलं आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं. शाळेतील विद्यार्थी, मुख्यध्यापक अगदी सगळ्यांनीच मुलांच्या स्वागतासाठी शाळेत तयारी केली आहे.
आजपासून पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थ्यांचा गजबजाट सुरू होतो आहे. विशेष म्हणजे नवीन इयत्ता, नवीन युनिफॉर्म, नवीन पुस्तकं यामुळे विद्यार्थीसुद्धा शाळेत जायला उत्सुक आहेत.
पिंपरी चिंचवडवडमधल्या नेहरूनगरमधील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक विद्यालयातील मुलांचं स्वागत फुलं आणि चॉकलेट देऊन शिक्षकांनी केलं. तर कोल्हापूरमध्ये मिकी माऊसने विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. मिकी माऊससोबत विद्यार्थ्यांनी धमाल मस्ती केली.
नाशिकमध्ये पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या शेठ आर. पी. विद्यालयात पहिलीच्या मुलांचं स्वागत टोप्या आणि चॉकलेट देऊन करण्यात आलं. तर जळगावमध्येही लहान मुलांना गुलाबाचं फुलं देऊन, त्यांना ओवाळून तसंच छोलताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं आहे.
धुळ्यामध्येसुद्धा आजपासून शाळा सुरू झाल्या. त्यामुळे उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांमध्ये मुलांची गर्दी बघायला मिळाली. यानिमित्ताने शहरातील गल्ली क्रमांक 5 मधील आनंदीबाई जावडेकर शाळेच्या विद्यार्थ्यांची रँली काढण्यात आली. तर जिल्हा परिषदेच्या एका शाळेत आज मुलांना पुस्तकांचं वाटप झालं.
शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सुसूत्रता यावी, यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू कराव्यात, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरातील बहुतांश प्राथमिक व माध्यमिक शाळा गुरुवारी सकाळपासून सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्याची सुटी संपून मुला-मुलींची पावलं पुन्हा शाळेकडे वळायला लागली आहेत