'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पटत नाही मनाला; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 04:18 PM2020-01-12T16:18:44+5:302020-01-12T16:20:20+5:30
दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात आज 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे भाजपाच्या नेत्यांनी प्रकाशन केले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजचे शिवाजी महाराज आहेत, अशा आशयाच्या पुस्तकाचे आज दिल्ली येथील भाजपा कार्यालयात प्रकाशन करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर टीका केली आहे.
दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात आज 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे भाजपाच्या नेत्यांनी प्रकाशन केले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर भाजपचे नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. यामुळे 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पटत नाही मनाला, असे म्हणत खिल्ली उडविली आहे.
जगा च्या अंता पर्येंत दुसरे #छत्रपतीशिवाजीमहाराज होणे नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2020
-
"आज के शिवाजी नरेंद्र मोदी"
-
पटत नाही मनाला pic.twitter.com/ckEu9e22ZB
भाजपकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला मात्र सोशल मिडियावरून विरोध होत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. तर मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करणे चुकीचे असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.