तोगडिया यांना बैलगाडा शर्यतीबाबत साकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 01:34 AM2017-01-25T01:34:09+5:302017-01-25T01:34:09+5:30
बजरंग दल आंबेगावच्या वतीने बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात, यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सचिव डॉ. प्रवीण तोगडिया यांना निवेदन
मंचर : बजरंग दल आंबेगावच्या वतीने बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात, यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सचिव डॉ. प्रवीण तोगडिया यांना निवेदन देण्यात आले.
बजरंग दल आंबेगाव तालुकाध्यक्ष सुहास बाणखेले यांनी निवेदनात, बैलगाडा शर्यती ही ४०० वर्षांपूवीपासूनची चालत आलेली परंपरा आहे. ही बैलगाडा शर्यत बंद झाल्यास ग्रामीण भागातील रूढी व परंपरा नष्ट होतील. तसेच बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांचे व्यवसाय बंद होऊन यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. शर्यत हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांचादेखील आहे. पेटा कायदा बंद झाला पाहिजे. जर गोवंशहत्या थांबवायाची असेल, तर बैलगाडा शर्यत ही सुरूच राहिली पाहिजे.
शर्यत सुरू असल्यामुळे गोवंशहत्या थांबण्यास मदत होईल. नाही तर बैल या प्राण्याला किंमत राहणार नाही. त्यामुळे गोवंश वाचविण्यासाठी बैलगाडा शर्यत सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन बाणखेले यांच्यासह गणेश गाडे, महेश थोरात व संतोष खामकर यांनी दिले आहे. (वार्ताहर)