भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र या - मुख्यमंत्री
By Admin | Published: August 10, 2016 04:32 AM2016-08-10T04:32:34+5:302016-08-10T04:32:34+5:30
२०२० मध्ये संपूर्ण देशाचे सरासरी वयोमान २९ वर्षे असेल. मोठे तरु ण मनुष्यबळ ही देशाची संपत्ती असून, येत्या काळात हा तरु णांचा देश संपूर्ण जगाचा मार्गदर्शक ठरणार आहे.
मुंबई : २०२० मध्ये संपूर्ण देशाचे सरासरी वयोमान २९ वर्षे असेल. मोठे तरु ण मनुष्यबळ ही देशाची संपत्ती असून, येत्या काळात हा तरु णांचा देश संपूर्ण जगाचा मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे देशाला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी, तसेच गरीबी व भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्वांनी मतभेद दूर ठेवून एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आॅगस्ट क्रांतीदिन आणि ‘चले जाव चळवळी’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘चलेजाव चळवळ २’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार आशीष शेलार, योगेश सागर, मंगल प्रभात लोढा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक शैलेश जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)