सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढा - नाना पाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 11:05 AM2016-10-19T11:05:04+5:302016-10-19T11:05:04+5:30
राज्यभरात निघत असलेल्या मोर्चांच्या पार्श्वभुमीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी जाती-जातीत वाढत चाललेलं अंतर कमी करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 19 - राज्यभरात निघत असलेल्या मोर्चांच्या पार्श्वभुमीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी जाती-जातीत वाढत चाललेलं अंतर कमी करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जातीनिहाय मोर्चे निघण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढून न्याय मागावा असंही ते म्हणाले आहेत. रोह्यात एका पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना नाना पाटेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
माणूस ही सर्वात सोपी जात आहे. आपल्या मूलभूत सुविधांसाठी मोर्चे काढावे लागत आहेत, हे आपलं अपयश आहे, असंही नाना पाटेकर यावेळी बोलले आहेत. नामच्या माध्यमातून केलेलं काम हे आपल्या आजवरच्या सर्व पुरस्कारांपेक्षा मोठं असल्याचं समाधानही नानांनी व्यक्त केलं.