‘विमानतळावरील १३० रुपये टोल रद्द करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 02:43 AM2017-05-20T02:43:20+5:302017-05-20T02:43:20+5:30
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सर्व प्रकारच्या वाहनांकडून १३० रुपये टोल जीव्हीके कंपनीकडून बेकायदेशीरपणे वसूल केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सर्व प्रकारच्या वाहनांकडून १३० रुपये टोल जीव्हीके कंपनीकडून बेकायदेशीरपणे वसूल केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. हा टोल विनाविलंब रद्द न केल्यास, शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा आमदार-विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांनी एका पत्राद्वारे जीव्हीके प्रशासनाला दिला आहे.
एअरपोर्ट आॅपरेटिंगची जबाबदारी असलेल्या जीव्हीकेकडे या करवसुलीसाठी पावती पुस्तकाशिवाय कोणतेही उत्तर नाही. पार्किंग चार्जही वाहन चालकांकडून घेण्यात येतो. विमानतळावर सगळीच वाहने थांबतातच असे नाही. त्यामुळे १३० रुपयांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे शिवसेनेच्या निदर्शनास आल्याचे आमदार परब यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.