टोल आकारणीच्या मासिक पासची योजना
By admin | Published: December 9, 2014 02:18 AM2014-12-09T02:18:42+5:302014-12-09T02:18:42+5:30
ठाणो-मुंबई दरम्यान टोल आकारणीसाठी मासिक पासची योजना सुरू केली जाईल. 35 रुपये एकेरी टोलनाका असेल तर महिन्याकाठी 35क् रुपये आकारून टोलचा पास दिला जाईल,
Next
नागपूर: ठाणो-मुंबई दरम्यान टोल आकारणीसाठी मासिक पासची योजना सुरू केली जाईल. 35 रुपये एकेरी टोलनाका असेल तर महिन्याकाठी 35क् रुपये आकारून टोलचा पास दिला जाईल, असे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकमतला सांगितले.
शिंदे यांनी ठाणो, कल्याण परिसरातील टोलनाके बंद करण्यासाठी अनेकदा आंदोलन केले होते. शिवसैनिकांनी त्या ठिकाणी बरेचदा तोडफोडदेखील केली होती. आता मंत्री झाल्यानंतर श्ंिादे या परिसरातील टोलनाके बंद करतील का याबाबत उत्सुकता होती. तथापि, नाके बंद केले जाणार नाहीत पण वाहनधारकांची लूटही होणार नाही असा मध्यममार्ग काढण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले.
राज्यातील टोलनाक्यांच्या पाच किलोमीटरच्या परिघात असलेल्या गावांना टोल लागणार नाही, असा आदेश लवकरच काढला जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी या बाबत सूतोवाच केले. ते म्हणाले की, रस्ते विकास महामंडळाला राज्य सरकारकडून 3 हजार 5क्क् कोटी रुपये घ्यावयाचे आहेत. त्यासाठी आपण पाठपुरावा करू. (विशेष प्रतिनिधी)