Toll Free in Ganesh Festival: गणेशोत्सवावेळी टोल माफी! एकनाथ शिंदेंनी एक महिना आधीच घोषणा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:56 PM2022-07-21T16:56:54+5:302022-07-21T16:58:35+5:30

गेली दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते, ते यंदा असणार नाहीत, असे शिंदे म्हणाले. 

Toll Free in Ganesh Festival: Toll waiver during Ganeshotsav from Mumbai, Pune to Konkan! Eknath Shinde announced a month before | Toll Free in Ganesh Festival: गणेशोत्सवावेळी टोल माफी! एकनाथ शिंदेंनी एक महिना आधीच घोषणा केली

Toll Free in Ganesh Festival: गणेशोत्सवावेळी टोल माफी! एकनाथ शिंदेंनी एक महिना आधीच घोषणा केली

Next

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवामध्ये मुंबई, पुण्यातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोल माफीची घोषणा केली आहे. यंदा दहीहंडी, गणेशोत्सव निर्बंध मुक्त परंतू नियमात राहून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गणेशोत्सव काळात दरवर्षीप्रमाणे कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांना टोल माफी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच पंढरपूर वारकऱ्यांना टोलमाफीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. गेली दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते, ते यंदा असणार नाहीत, असे शिंदे म्हणाले. 

परंतू दहीहंडेचे थर आणि उत्सव साजरा करणे हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसारच होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
गणेशोत्सव आणि दहीहंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज अतिशय महत्वाची बैठक झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर मर्यादा होत्या. निर्बंध होते. इच्छा असूनही उत्सव साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षांतील मर्यादा पाहता यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्साहात साजरे झाले पाहिजेत, असा कल दिसून आला. त्यामुळे यावर्षी सर्व उत्सव निर्बंधांविना साजरे होतील. कायदा सुव्यवस्था राखून सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

कोकणातील महामार्गावरील खड्डे बुजवा
गणेशोत्सवापूर्वी सर्व मार्गांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडपांच्या परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत. यासाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आल्या आहे. गणेश मंडळांना नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. कोरोनामुळे उंचीवर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  


 

Web Title: Toll Free in Ganesh Festival: Toll waiver during Ganeshotsav from Mumbai, Pune to Konkan! Eknath Shinde announced a month before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.