नवीन रस्त्यांवर जड वाहनांनाच टोल
By Admin | Published: February 11, 2016 01:41 AM2016-02-11T01:41:50+5:302016-02-11T01:41:50+5:30
राज्यात इथूनपुढे होणाऱ्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर सर्वप्रकारची चारचाकी वाहने, एसटी, स्कूलबस या वाहनांना टोल आकारला जाणार नाही. केवळ जड वाहनांकडूनच टोलवसुली
पुणे : राज्यात इथूनपुढे होणाऱ्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर सर्वप्रकारची चारचाकी वाहने, एसटी, स्कूलबस या वाहनांना टोल आकारला जाणार नाही. केवळ जड वाहनांकडूनच टोलवसुली केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्रचा नारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने छोट्या वाहनांना टोलमधून वगळण्याचा निर्णय घेतला
आहे. पाटील यांनी बुधवारी
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘नवीन मोठी रस्तेबांधणीची कामे करायची असतील तर टोल आकारावाच लागणार आहे. पण हा टोल केवळ जड वाहनांकडूनच वसुल केला जाईल. यापुढे तयार होणाऱ्या प्रत्येक टोलनाक्यावर लहान वाहनांसह एसटी व स्कुलबसला टोलमधून सुट दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)