लवकरच टोलचे धोरण आणणार!

By admin | Published: December 16, 2014 01:08 AM2014-12-16T01:08:22+5:302014-12-16T01:08:22+5:30

नागपूर शहरात प्रवेश करताना पाच ठिकाणी टोल भरावा लागत असून तो रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे का, असा प्रश्न चिमूरचे आमदार बंटी भांगिडया, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी,

Toll Policy to be launched soon! | लवकरच टोलचे धोरण आणणार!

लवकरच टोलचे धोरण आणणार!

Next

विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांची माहिती
नागपूर शहरात प्रवेश करताना पाच ठिकाणी टोल भरावा लागत असून तो रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे का, असा प्रश्न चिमूरचे आमदार बंटी भांगिडया, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे आण िराजूरचे आमदार संजय धोटे यांनी विचारला होता. त्यावर उत्तरादाखल मा. ना. एकनाथ शिंदे यांनी असा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, राज्यातील एकूणच टोलचे धोरण ठरवण्याबाबत समतिी नेमण्यात आली असून दोन मिहन्यांत या समतिीचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.
मात्र, टोल रद्द कधी होणार, ते सांगा, असा आग्रह जयदत्त क्षीरसागर, सुनील देशमुख, छगन भुजबळ, गोपाळदादा अग्रवाल आदी सदस्यांनी धरला. त्यावर आपल्याच सरकारने करारनामे केले आहेत, याची जाणीव शिंदे यांनी करून दिली. टोलच्या विरोधात आंदोलने आम्हीच केली. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Toll Policy to be launched soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.