कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती !
By admin | Published: September 25, 2016 01:02 AM2016-09-25T01:02:16+5:302016-09-25T01:02:16+5:30
भार्इंदर येथील वरसावे खाडीपूल नादुरुस्त झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ठाणे शहराच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याची दखल घेऊन राज्याचे
ठाणे : भार्इंदर येथील वरसावे खाडीपूल नादुरुस्त झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ठाणे शहराच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तातडीने आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत खारीगाव टोलनाक्यावर वाहतूककोंडीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा टोल न घेण्याची तंबी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी आयआरबी कंपनीला शनिवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवून जेएनपीटीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या मालवाहू वाहनांचे नियंत्रण कक्षाद्वारे नियमन करण्याचे निर्देश ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना तसेच जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह ठाणे शहर वाहतूक पोलीस, नवी मुंबई शहर वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते, जेएनपीटी, ठाणे महापालिका, एमएसआरडीसी आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)