हे टोलनाके बंद होणार

By admin | Published: April 11, 2015 02:35 AM2015-04-11T02:35:17+5:302015-04-11T02:35:17+5:30

राज्य सरकारने आज जे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला ते टोलनाके पुढीलप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग

This tollenake will be closed | हे टोलनाके बंद होणार

हे टोलनाके बंद होणार

Next

मुंबई : राज्य सरकारने आज जे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला ते टोलनाके पुढीलप्रमाणे
सार्वजनिक बांधकाम विभाग :
१) अलिबाग-पेण-खोपोली रस्ता -वडखळ नाका २) वडगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता - शिक्रापूर नाका ३) मोहोळ-कुरुळ-कामती रस्ता - मोहोळ नाका ४) वडगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता- भंडाराडोंगर नाका ५) टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर रस्ता - कुसळब नाका ६) अहमदनगर-कर्माळा-टेंभूर्णी रस्ता - अकोले नाका ७) नाशिक-वणी रस्ता -ढकांबे, नांदुरी नाका आणि सप्तश्रृंगी गड चेक नाका ८) भुसावळ-यावल-फैजपूर रस्ता- तापीपुलाजवळील नाका ९) खामगाव वळण रस्ता -रावणटेकडी नाका. अशाप्रकारे नऊ रस्त्यांवरील ११ नाके बंद करण्यात येणार आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळ :
१) रेल्वे ओव्हरब्रिज तडाली (जि.चंद्रपूर) - तडाली टोलनाका.
या पथकर नाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेसना टोल लागणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग :
१) भिवंडी-वडपे रस्ता - कशेळी गावाजवळील नाका २) चिंचोटी-कामण-पायगाव रस्ता- मालोडी गाव नाका ३) मनोर-वाडा-भिवंडी रस्ता - वाघोटे आणि कवाड नाका ४) सायन-पनवेल विशेष राज्य रस्ता -पुणे दिशेकडील दोन्ही नाके ५) नाशिक-निफाड-औरंगाबाद रस्ता - शिलापूर आणि अंदरसूल नाका ६) अहमदनगर-वडाळा-औरंगाबाद रस्ता- शेंडीजवळील नाका ७) अहमदनगर-वडाळा-औरंगाबाद - खडकाफाटा आणि लिंबे नाका ८) अहमदनगर-कोपरगाव रस्ता - देहरे गावाजवळील नाका ९)पुणे-अहमदनगर रस्ता-म्हसणे फाटा नाका १०) प्रकाशा-छडवेल-सोग्रस-सटाणा-दहीवेल रस्ता -भाबडबारी नाका ११) चांदवड-मनमाड-नांदगाव रस्ता - दुगाव आणि पानेवाडी चेकपोस्ट नाका १२) मालेगाव-मनमाड-कोपरगाव रस्ता- येसगाव नाका १३) औरंगाबाद-जालना रस्ता- लाडगाव आणि नागेवाडी नाका १४) नांदेड-नरसी रस्ता- बरबडा नाका १५) शिरुर-ताजबंद-मुखेड-नरसी-बिलोली रस्ता - तिन्ही नाके १६) जालना-वाटूर रस्ता- पिंपरी फाटा नाका १७) मलकापूर-बुलडाणा-चिखली रामा रस्ता -दोन्ही टोलनाके. १८) जाम-वरोरा रस्ता - आरंभा गावाजळील नाका १९) वरोरा-चंद्रपूर-बामणी रस्ता - नंदुरी आणि विसापूर नाका. (प्रतिनिधी)

Web Title: This tollenake will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.