कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 05:03 PM2017-08-02T17:03:13+5:302017-08-02T17:03:16+5:30
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या छोट्या गाड्यांना टोलमाफी करण्यात आली आहे
मुंबई, दि. 2 - कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणा-या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफी मिळाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या छोट्या गाड्यांना टोलमाफी करण्यात आली आहे. 22, 23 आणि 24 ऑगस्टला जाणा-या गाड्यांना ही टोलमाफी देण्यात आली आहे. मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी मिळावी, यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोकणात गणेशोत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस स्टेशन आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते. या पाससाठी चाकरमान्यांना त्यांचा सध्याचा निवासी पत्ता, कोकणातील गावचा पत्ता, वाहन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आदी तपशील द्यावा लागला होता.
याचबरोबर गणेशोत्सवासाठी कोकणात एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येतात. तर, मुंबईहून मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात.