आवक घटल्याने टोमॅटो १०० रुपये किलो!
By admin | Published: June 14, 2016 02:50 AM2016-06-14T02:50:47+5:302016-06-14T02:50:47+5:30
पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो
नाशिक : पंधरवड्यापूर्वी हवामानात बदल झाल्याने त्याचा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होऊन येथील बाजारात आवट घटली, त्यामुळे येथील किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
गेल्यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने त्याचा टोमॅटोच्या लागवडीवर मोठा झाला. त्यातच पाणी टंचाई व उन्हाच्या तडाख्यामुळे पिकांवर परिणाम झाला. पंधरवड्यापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फुलोरा गळून गेला, तर बऱ्याच ठिकाणी उन्हामुळे रोपे सुकली. सध्या बाजार समितीत माल विक्र ीसाठी येत असून, २० किलो टोमॅटोच्या क्रेटला १,३५० रुपये बाजारभाव मिळत आहे. ६५ रुपये प्रति किलो असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे, तर किरकोळ बाजारात १०० रुपये दर आहे. (प्रतिनिधी)
पंधरवड्यापासून टोमॅटोला मागणी वाढली आहे. मात्र बाजारात आवक घटल्याने भाव तेजीत आले आहेत. वादळी वारा व उन्हामुळे काही ठिकाणी फुलोरा झडला, तर रोपे सुकली. आवक कमी असल्याने व त्यातच मागणी वाढल्याने दर वाढले आहेत.
- बाळासाहेब महाले, व्यापारी