परेची वाहतूक पूर्ववत होण्यास उजाडणार उद्याची सकाळ

By admin | Published: September 15, 2015 11:36 AM2015-09-15T11:36:26+5:302015-09-15T17:19:52+5:30

अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान लोकलचे डबे घसरल्याच्या घटनेला ६ तास उलटून गेल्यावरही पश्चिम रेल्वेची वाहतूक अद्याप रखडलीच असून उद्या सकाळपर्यंत तरी हा बिघाड दुरूस्त होणार नाही.

Tomorrow morning, the traffic will be over for the rest of the traffic | परेची वाहतूक पूर्ववत होण्यास उजाडणार उद्याची सकाळ

परेची वाहतूक पूर्ववत होण्यास उजाडणार उद्याची सकाळ

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान लोकलचे डबे घसरल्याच्या घटनेला ६ तास उलटून गेल्यावरही पश्चिम रेल्वेची वाहतूक अद्याप रखडलीच असून उद्या सकाळपर्यंत तरी ही दुरूस्त पूर्ण होऊ शकणार नसल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले. हार्बर मार्गावर लोकल ट्रेनचे डबे घसरल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेवरही लोकल ट्रेनचे डबे घसरले आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. 

मंगळवारी सकाळी १०.५६ ची विरार - चर्चगेट लोकलचे ४ डबे अंधेरी - विलेपार्ले स्टेशनदरम्यान क्रॉसिंगवेळी घसरले. अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील दोन्ही दिशेकडील जलद मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली असून सध्या केवळ धीम्या मार्गावरील वाहतूक सुरु असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पहायला मिळाली. जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असले तरी बिघाड दुरूस्त होऊन वाहतूक पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागू शकतो. दरम्यान रेल्वेचा खोळंबा झाल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतुकीवर पडणारe ताण लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनातर्फे १५ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान या अपघातानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारल्याने ४ जण जखमी झाले. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील लोकल सेवा अपघात व तांत्रिक बिघाडांमुळे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. मासिक पासमध्ये वाढ करुनही रेल्वे सुरक्षित व वेळेवर सेवा देण्यास अपयशी ठरत असल्याची भावना प्रवासी व्यक्त करत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे स्वतः मुंबईकर असल्याने त्यांनीच या प्रश्नाकडे गांभीर्याने  बघावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

पश्चिम रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे :

बोरिवली - 02267634053, 02228053001

मुंबई सेंट्रल - 02267645551, 02223051665 

अंधेरी: 02267630012, 02226832174

Web Title: Tomorrow morning, the traffic will be over for the rest of the traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.