उद्या रंगणार लोकमत पुरस्कार सोहळा

By admin | Published: June 27, 2014 01:27 AM2014-06-27T01:27:42+5:302014-06-27T01:27:42+5:30

लोकमत समूहाच्या वतीने रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग फायनान्स आणि एच.आर. क्षेत्रतील मान्यवर आणि संलग्न संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Tomorrow Tomorrow will celebrate the award | उद्या रंगणार लोकमत पुरस्कार सोहळा

उद्या रंगणार लोकमत पुरस्कार सोहळा

Next
>मुंबई : लोकमत समूहाच्या वतीने रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग फायनान्स आणि एच.आर. क्षेत्रतील मान्यवर आणि संलग्न संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रंत उल्लेखनीय कामगिरी करून यशाचे उत्तुंग शिखर गाठणा:या व्यक्तींसोबतच नामांकित संस्थांचा गौरवही या वेळी केला जाणार आहे. शनिवार, 28 जून रोजी वांद्रे येथील ताज लँड्समध्ये हा शानदार सोहळा रंगणार आहे.
रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रत पुढील दहा वर्षात 25 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी थेट विदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे. वाढते शहरीकरण, स्थलांतर, पायाभूत सुविधांचा विकास, विभक्त कुटुंब पद्धती, हाउसिंग सोसायटीचा ट्रेंड यामुळे सामान्य जनता रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रंकडे वळत आहे. 
या बदलामुळे 2क्2क् सालार्पयत रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रचा महसूल कोटय़वधी अमेरिकी डॉलर्स इतकी उंची गाठण्याची शक्यता आहे. या धर्तीवर लोकमत समूहाने रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट प्रकल्प तसेच क्षेत्रतील नामांकित मंडळींना सन्मानित करण्याचे ठरविले आहे. गेल्या काही वर्षात बँकिंग आणि फायनान्स (बीएफएसआय) क्षेत्रने उभारी घेतली असून, आताची पिढी करिअर म्हणून या क्षेत्रकडे पाहत आहे. येत्या दशकभरात बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रचा कायापालट होणार आहे. 
हल्लीच्या काळात कोणत्याही क्षेत्रच्या चांगल्या व्यवस्थापनात एच.आर. क्षेत्रची भूमिका महत्त्वाची असते. कर्मचा:यांना काम करण्यासाठी आल्हाददायक वातावरणनिर्मिती करणो हे एच.आर.चे मुख्य काम आहे. या गुणांनी परिपूर्ण असणा:या आणि क्षेत्रत आपले वेगळे स्थान निर्माण करणा:या मान्यवर व्यक्तींना तसेच संस्थांना लोकमत समूह सन्मानित करणार आहे. (प्रतिनिधी)
 
असा होईल सोहळा
च्लोकमत अॅस्पायर एचआर लीडरशिप अॅवॉर्ड्स 2014 हा पुरस्कार सोहळा सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत ताज लँड्समध्ये पार पडेल. हा सन्मान सोहळा पटेल ग्रुप अँड कं. डेव्हलपर्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, रिजन्सी ग्रुप आणि सिद्धीटेक होम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने पार पडेल.
च्लोकमत बीएफएसआय अॅवॉर्ड्स 2014 हा पुरस्कार सोहळा दुपारी 2 ते 4 या वेळेत ताज लँड्समध्ये पार पडेल. या सन्मान सोहळ्याला पटेल ग्रुप अॅण्ड कं. डेव्हलपर्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर हे मुख्य प्रायोजक आहेत. शिवाय रिजन्सी ग्रुप, सिद्धीटेक होम्स प्रा. लि. 
यांचा सहयोग आहे. तर नातू परांजपे रिअॅल्टर्स आणि वास्तुरविराज हे सहप्रायोजक असणार आहेत.
च्लोकमत रिअल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर अॅवॉर्ड्स 2क्14 हा पुरस्कार सोहळा 28 जून रोजी सायंकाळी 6.30 ते 9 या वेळेत वांद्रे येथील ताज लँड्समध्ये होईल. वास्तुरविराज या सन्मान सोहळ्याचे सहप्रायोजक असतील.

Web Title: Tomorrow Tomorrow will celebrate the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.