आज रात्री उल्का वर्षाव पाहण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:34 PM2017-12-13T23:34:33+5:302017-12-13T23:34:48+5:30
खगोलप्रेमींन आज पुन्हा एकदा उल्का वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. बुधवारी मध्यरात्री मिथुन राशीतील उल्कावर्षाव मध्यरात्री दिसणार आहे.
मुंबई - खगोलप्रेमींन आज पुन्हा एकदा उल्का वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. बुधवारी मध्यरात्री मिथुन राशीतील उल्कावर्षाव मध्यरात्री दिसणार आहे. पहाटेपर्यंत दिसणाऱ्या या उल्कापातामधील उल्कांचे प्रमाण ताशी 100 ते 120 एवढे राहण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल मेटिओर ऑर्गनायझेशनने याबाबत माहिती दिली आहे.
उत्कावर्षाव हा धुमकेतूच्या शेपटीमधील धुलीकण वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यामुळे होत असतो. मात्र मिथुन राशीमधील उल्कावर्षावाचा स्रोत हा 3200 फेथन हा लघूग्रह असल्याचे मानले जाते. या लघुग्रहाचे तुकडे आणि धुलीकण वातावरणात आल्याने हा उल्कापात होतो. धुमकेतूच्या शेपटीमधील धुलीकणांपेक्षा लघुग्रहाचे तुकडे मोठे असल्याने मिथुन राशीमधील उल्कापात अधिक तेजस्वी दिसतो.
याआधी १७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव झाला होता.
कोठे घ्यावा उल्का वर्षावाचा आनंद ?
उल्कावषार्वाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शहरापासून थोडे दूर, एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर, अंधाºया ठिकाणी गेल्यास हा वर्षाव अतिशय सुस्पष्ट दिसेल. आपल्या घराच्या गच्चीवरुन किंवा विस्तीर्ण मैदानावरूनही हा उल्कापात पाहता येतो. शकता, पण तेथून संपूर्ण अवकाश दिसायला हवे. अशा ठिकाणी चटई अंथरून त्यावर पडून निवांत निरिक्षण करण्याचाही आनंद लुटता येईल.
कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ साध्या डोळ्यांनी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे. खगोलप्रेमी असाल तर या उल्कापाताच्या नोंदीही घेता येणार आहे. एखाद्या खगोल तज्ञ व्यक्तीसोबत हा उल्का वर्षाव पाहिल्यास आकाशातील नक्षत्र, राशी, तारका समूहांची माहितीही करून घेता येईल. यामुळे अवकाश निरीक्षणाचा आनंद द्विगुणित होणार आहे.