एका क्लिकवर दिवसभरातील महत्वाच्या 10 बातम्या

By admin | Published: April 14, 2017 08:58 PM2017-04-14T20:58:53+5:302017-04-14T20:58:53+5:30

राजकीय, क्राईम, मनोरंजन तसेच देश-विदेशात घडलेल्या दिवसभरातल्या महत्वाच्या 10 घडमोडी वाचा एका क्लिकवर

Top 10 news in a day with one click | एका क्लिकवर दिवसभरातील महत्वाच्या 10 बातम्या

एका क्लिकवर दिवसभरातील महत्वाच्या 10 बातम्या

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव जनरल आमेर सईद रान यांनी शुक्रवारी एका बैठकीनंतर ही माहिती दिली. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केलं आहे.  (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/UkpA9G

अफगाणिस्तानमधील इसिसच्या तळांवर अमेरिकेने गुरुवारी केलेल्या शक्तिशाली बॉम्बहल्ल्यात 36 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यामध्ये केरळमधून इसिसमध्ये भरती झालेल्या तरुणाचाही समावेश आहे. याशिवाय यामध्ये अन्य 20 भारतीयांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात इसिसला लक्ष्य करताना जीबीयू-43/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) हा महाशक्तिशाली बॉम्ब टाकला त्यावेळी हे भारतीय त्याच परिसरात उपस्थित होते. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/doW8Nw)
उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या लवकरच बंद केल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/lvl9wn)
डिजीधनचा जो मंत्र भारत सरकारने देशाला दिला आहे. त्याव्दारे अर्थव्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल, व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात व्यक्त केला. नागपुरातील मानकारपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी आयोजित ह्यभीम आधार अ‍ॅपह्ण च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/Sk6Vfo)
आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर आहेत. या सर्वांची आयकर विभाग कसून चौकशी करणार आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर बाजारात आलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने ऑपरेशन क्लीन मनी कारवाईला सुरुवात झाली आहे. ऑपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात नोटाबंदीदरम्यान संशयितरित्या आर्थिक व्यवहार करणा-या 18 लाख लोकांना नोटीस पाठवली होती. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/tNFWij)
देशातील एक कोटी बँकधारकांच्या खात्याची माहिती लीक झाली असून विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँक खात्यांशी संबंधित ही खासगी माहिती अत्यंत कमी दरात विकली जात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात फक्त 10 ते 20 पैशांमध्ये तुमच्या खात्याशी संबंधित माहिती विकली जात असल्याचं समोर आलं आहे. ( सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/yzRC93)
दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना जोरदार झटका दिल्यानंतर आम आदमी पक्षाने आपली रणनिती बदलली आहे. यापुढे दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य न करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. (सविस्तर बातमीसाठी https://goo.gl/sJk6wd)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला. यासोबतच मुंबईने आयपीएलमधील सलग तिस-या विजयाची नोंद केली. बंगळुरुने दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात अत्यंत दयनिय झाली. केवळ 7 धावांवरच मुंबईचे 4 खेळाडू बाद झाले होते. (सविस्तर बातमीसाठी -  https://goo.gl/CBiJ47)
संजय दत्तच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या शुटींगमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर व्यस्त आहे. पण या सिनेमाचं चित्रीकरण थांबवावं लागलं आहे. रणबीर संजय दत्तच्या पाली हिल येथील घराबाहेर शूटिंग करत होता मात्र, संजय दत्तच्या शेजा-यांनी याला विरोध केला आणि याविरोधात निदर्शनं केली. (सविस्तर बातमीसाठी  https://goo.gl/q9EgNN)
सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर लवकरच नव्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर हा सिनेमा साकारत आहे. "एफयू" असं या सिनेमाचं नाव असून आकाशचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. (सविस्तर बातमीसाठी  https://goo.gl/llmlqH)

Web Title: Top 10 news in a day with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.