खेळावर बनलेले बॉलिवूड मधील आघाडीचे १२ चित्रपट

By Admin | Published: July 1, 2016 07:55 PM2016-07-01T19:55:56+5:302016-07-01T19:55:56+5:30

खेळ या विषयावरील आणि त्यातही आत्मचरित्रपटांची संख्या बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मध्यंतरीच्या काळाच अशा चित्रपटांची लाटाच हिंदी चित्रपटांमध्ये आली आहे. अशाच काही चित्रपटावर एक नजर टाकूयात.

The top 12 Bollywood movies made on the Game | खेळावर बनलेले बॉलिवूड मधील आघाडीचे १२ चित्रपट

खेळावर बनलेले बॉलिवूड मधील आघाडीचे १२ चित्रपट

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ : खेळ या विषयावरील आणि त्यातही आत्मचरित्रपटांची संख्या बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मध्यंतरीच्या काळाच अशा चित्रपटांची लाटाच हिंदी चित्रपटांमध्ये आली आहे. भारतीय लोकांना खेळावर आधारीत चित्रपट आवडतात. असे चित्रपट पाहण्यासाटी ते उस्ताह दर्शवत असतात. बॉलिवूडमध्ये खेळावर अधारीत अलेल्या बऱ्याच चित्रपटांने प्रेषकांनी पसंती दर्शवली तर काही चित्रपट तिकिट खिडकीवर सपशेल अपयशी ठरले. सध्या खेळावर अधारीत बनत असलेल्या चित्रपटाच्या माध्यमांतून मनोरंन देखिल केले जात आहे. अशाच काही चित्रपटावर एक नजर टाकूयात. 

 
लगान : लगान हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट आशुतोष गोवारीकरने दिग्दर्शित केला होता. अपार उत्सुकता घेउन प्रदर्शित झालेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देउन गेला. चित्रपट नव्हे तर क्रिकेटचा सामना म्हणून बरीच टिका झाली परंतु याच नाविन्याने चित्रपटाला प्रसिद्दी दिली. अतिशय नाविन्यपूर्ण विषय, कथानकाची प्रभावी मांडणी, ब्रिटीशकालीन ग्रामीण भारताची वातावरण निर्मिती. यामुळे या चित्रपटाला आपार यश मिळाले. भारतातील अनेक पुरस्कार पटकाविले व मदर इंडिया व सलाम बॉम्बे नंतर हा केवळ तिसरा भारतीय चित्रपट आहे ज्यास ऑस्कर नामांकन लाभले.
 
चक दे इंडिया : क्रिकेटच्या तुलनेत दुर्लक्षिल्या गेलेल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीची दुरवस्था ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. चक दे! इंडिया हा जिमीत सहानी संकलित आणि शिमित अमिन दिग्दर्शित, भारतीय महिला हॉकी संघावर आधारित हिंदी चित्रपट आहे. एखादी इच्छा, सांघिक कामगिरी आणि चांगला प्रशिक्षक व त्याचे योगदान एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकते, हे या चित्रपटामध्ये सुरेखपणे मांडले आहे. चित्रपटामध्ये शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

भाग मिल्खा भाग : फ्लाइंग सिख, भारतीय एथलीट मिल्खा सिंह यांच्या जिवनावर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला. यामध्ये फ़रहान अख़्तर, सोनम कपूर आणि दिव्या दत्ता यांनी मु्ख्य भुमिका केल्या आहेत. 
 
पान सिंह तोमर : तिग्मांशु धूलिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चितरिपट भारतीय भारतीय एथलीट, पान सिंह तोमर यांच्या जिवनावर आदारीत आहे. यामध्ये एक खेळाडू आर्मीमध्ये भर्ती होऊन देखिल डाकू बनतो. या चित्रपटात पान सिहं यांची भुमिका इरफान खान याने निभावली आहे. तर  माही गिल आणि विपिन शर्मा ही मुख्य भुमिकेत आहेत.  
 
जो जीता वही सिकंदर : आमिर ख़ान, आयशा जुल्का, पूजा बेदी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट सायकलिंगवर आधारीत आहे. 
 
दन दना दन गोल : फुटबॉल या खेळावर आधारीत असलेला एकमात्र भारतीय चित्रपट म्हणजे दन दना दन गोल होय. यामध्ये जॉन, अरशद वारसी और बिपाशा बसु यांनी मुख्य भुमिका केल्या आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी दिगदर्शित केलेला हा चित्रपट इंग्लडमधील दक्षिण आशिया कल्ब वर आधारीत आहे. 
 
साला खडूस : मुष्टियुद्धासारख्या खेळामध्ये महिलांचे स्थान, खेळाडू व प्रशिक्षकातील नातेसंबंध व या क्षेत्रातील राजकारण यांवर ‘साला खडूस‘ हा चित्रपट प्रकाश टाकतो. आर. माधवनची धडाकेबाज भूमिका आणि त्याला नवोदित नायिका (व खरीखुरी बॉक्‍सर) रितिका सिंगनं दिलेली साथ दिली आहे. 
 
मेरी कोम : प्रसिद्ध महिला बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर 'मेरी कोम' नावाचाच चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. प्रियंका चोप्राने ने मेरी कोमची व्यक्तिरेखा साकारली आहे. यात तिचं वैयक्तिक आयुष्य, त्यामधला एक संघर्ष, प्रवाहाविरुद्ध पोहण्यामध्ये असलेली तिची जिगरबाज वृत्ती, आपलं स्वप्न साकार करण्यासाठी मोजावी लागणारी किंमत या सार्‍या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारा असा हा सिनेमा आहे. कारण हा सिनेमा केवळ क्रीडाक्षेत्रातील बॉक्सिंग करिअर इथपर्यंत न राहता मणिपूर अन तिथल्या नागरिकांच्या जगण्यावर भाष्य करतो. 
 
हवा हवाई : खेडेगावात रहाणारा अर्जुन(पार्थो गुप्ते)त्याच्या वडीलांबरोबर(मकरंद देशपांडे)देवासमोर पुजा करतांना दाखविला आहे. दिग्दर्शक अमोल गुप्ते 'तारे जमीं पर' व 'स्टॅनले का डिब्बा' सारखे उत्कॄष्ट बालचित्रपट दिल्यानंतर परत एकदा खुप चांगला विषय, खुप मोठ्ठे प्रश्न सहजगत्या आपल्यासमोर मांडतांना दिसतात व सर्व लहानथोर प्रेक्षकांना खुष तर नक्किच करतात. 
 
इक्बाल : इक्बाल नावाच्या एका मुक्या तरूण मुलाची क्रिकेट खेळातील गोलंदाज होण्याची तीव्र इच्छा त्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करवून क्रिकेटपटू बनवते हे व यशस्वी होउन तो भारतीय क्रिकेट संघात त्याचा समावेश होतो. असे या चित्रपटात दाखवले आहे. यात नसीरुद्दीन शाह आणि श्रेयस तळपदे यांनी मुख्य भुमिका साकारल्या आहेत.
 
दिल बोले हडिप्पा : दिल बोले हडिप्पा हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. क्रिकेट या खेलावर आधारीत हा चित्रपट आहे. अनुराग सिंगने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात राणी मुखर्जी व शाहिद कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
स्ट्राइकर : या चित्रपटात एक्शन आणि ड्रामा आहे. हा चित्रपट कॅरम या खेळावर आधारीत आहे. यात सिद्धार्थ, विद्या मालवडे, अनुपम खेर आणि आदित्य पांचोली यांच्या प्रमुख भुमिका आहेत. एका मुलाच्या कॅरमच्या खेळणाच्या जिद्दीची ही कथा आहे.
 

 

Web Title: The top 12 Bollywood movies made on the Game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.