मुद्रा योजनेत देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्र, 3 वर्षात 42 हजार कोटींचे कर्ज वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 01:59 PM2018-01-11T13:59:14+5:302018-01-11T16:28:23+5:30

‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेत’ महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात  42 हजार 860 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मुद्रा योजनेत 40 हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित करणाऱ्या देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.

In the top three states of Maharashtra, Rs. 42,000 crore loan distribution in three years | मुद्रा योजनेत देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्र, 3 वर्षात 42 हजार कोटींचे कर्ज वितरण

मुद्रा योजनेत देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्र, 3 वर्षात 42 हजार कोटींचे कर्ज वितरण

Next

नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेत’ महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात  42 हजार 860 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. मुद्रा योजनेत 40 हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित करणाऱ्या देशातील टॉप तीन राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.
देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये मुद्रा योजना सुरू केली. या योजनेत शिशु, किशोर व तरुण कर्ज अशा तीन टप्प्यात बँकांमार्फत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
तीन वर्षात महाराष्ट्रात 91 लाख कर्ज प्रकरणे मंजूर-
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात 91 लाख 53 हजार 619 कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून 44 हजार 49 कोटी  17 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे व  42 हजार 860 कोटी 43 लाख रुपये लघु उद्योजकांना वितरित करण्यात आले आहेत. सन 2015-16 या वर्षात 13 हजार 372 कोटी 42 लाख रुपयांचे कर्ज  प्रत्यक्षात वितरित करण्यात आले. 2016- 17 या वर्षात 16 हजार कोटी 976 लाख 76 हजार तर 2017-18 या वर्षात 12 हजार 511 कोटी 25 लाख इतके कर्ज प्रत्यक्षात लघु उद्योजकांना वितरित करण्यात आले.
देशात 4 लाख कोटीचे कर्ज वितरण-
मुद्रा योजनेत तीन वर्षात 10 कोटींहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली असून लघु उद्योगांना 4 लाख 43 हजार 496 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू ही राज्ये मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये टॉप तीनमध्ये समाविष्ट आहेत. या तीन राज्यात 40 हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज गेल्या तीन वर्षात वितरित झाले आहे. 
तरुणकर्ज प्रकारात महाराष्ट्र देशात अव्वल, 12 हजार कोटींचे कर्ज वितरण-
मुद्रा योजनेतील तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र देशातील क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. या प्रकारात 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. गेल्या तीन वर्षात तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्रात 12 हजार 176 कोटी 13 लाख रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात वितरित करण्यात आले आहे. 
किशोर कर्ज गटात 50 हजार ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यामध्ये राज्यात तीन वर्षात  11 हजार 956 कोटी 95 लाख तर शिशु कर्ज गटात 18 हजार 727 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. शिशु गटात 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. 
 

Web Title: In the top three states of Maharashtra, Rs. 42,000 crore loan distribution in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.