पोलीस ठाण्याच्या आवारात तुफान दगडफेक
By Admin | Published: March 9, 2015 01:47 AM2015-03-09T01:47:06+5:302015-03-09T01:47:06+5:30
येथील पोलीस ठाण्याच्या आवारात जनावरांची वाहतूक करण्यावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. त्यात दोघे जखमी झाले असून,
उंब्रज (सातारा) : येथील पोलीस ठाण्याच्या आवारात जनावरांची वाहतूक करण्यावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. त्यात दोघे जखमी झाले असून, एक जण गंभीर आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे पन्नास तरुणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या मािहतीनुसार, पाटण ते सातारा दरम्यान म्हशींची वाहतूक करणारा टेम्पो एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास पकडून पोलीस ठाण्यात आणला.
त्यानंतर सातारा आणि कऱ्हाडवरून वीस ते पन्नास तरुण उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर सुरू झालेल्या दगडफेकीत फिरोज सौदागर हा गंभीर व मन्सूर सौदागर (दोघे रा. कऱ्हाड) हा किरकोळ जखमी झाला. (प्रतिनिधी)