मातेसह अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By admin | Published: June 2, 2016 10:50 PM2016-06-02T22:50:50+5:302016-06-02T23:11:12+5:30

जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील एक महिला व तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर दोघांनी बलात्कार केला. तसेच त्यांना जबर मारहाण करून चाकूनेही त्यांच्यावर वार केले.

Torture on minor girls with mother | मातेसह अल्पवयीन मुलींवर अत्याचार

मातेसह अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Next

गोंदिया : जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील एक महिला व तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर दोघांनी बलात्कार केला. तसेच त्यांना जबर मारहाण करून चाकूनेही त्यांच्यावर वार केले. २६ मेच्या रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी अद्याप या घटनेची दखल घेतलेली नाही. बलात्काराची तक्रारच नोंदवून घेतली नाही, असा आरोप गुरूवारी पीडित महिलेसह मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी मात्र याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. पत्रकारांसमोर ही घटना कथन करताना पीडित महिलेने सांगितले की, पती एक महिन्यापूर्वी हैद्राबाद येथे मजुुरी करण्यासाठी गेल्याने घरी आपल्या १७ व १५ वर्षांच्या दोन मुली आणि ११ वर्षीय मुलासमवेत राहते. गावातील तेजेंद्र रूपलाल हरिणखेडे (३८) व विलास केशोराव रहांगडाले (२८) या दोघांची तिच्यावर वाईट नजर होती. त्यांनी तिचे अनैतिक संबंध असल्याची अफवा गावात पसरवली. त्यातूनच दोघे मागील तीन-चार महिन्यांपासून तिचा छळ करीत होते, असे या महिलेने सांगितले. या दोघांनी २६ मे रोजी तिच्यासह दोन्ही अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच घरात शिरून शारीरिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, त्यांना जबर मारहाण करून चाकूचे वार केले. पोलिसांत तक्रार केली व गावांत राहिल्या तर जीवानिशी ठार मारू, अशी धमकी आरोपींनी पीडित मायलेकींना दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. या घटनेमुळे भयभीत झालेली महिला, तिच्या दोन मुली व मुलगा दोन दिवसपर्यंत घराबाहेर पडली नाही. मारहाणीमुळे बेशुद्ध झालेली पीडित महिला शुद्धीवर आल्यावर २८ मे रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ केली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला. मात्र बलात्काराचे कलम लावण्यात आली नाही.

या महिलेने तक्रार नोंदविताना बलात्काराचा कुठेही उल्लेख केला नाही. तिचा जबाब इन-कॅमेरा नोंदविण्यात आला आहे. यावेळी महिला दक्षता समितीच्या दोन सदस्यही उपस्थित होत्या. या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे.

- रवींद्र शिंदे, पोलीस निरीक्षक, गोरेगाव

Web Title: Torture on minor girls with mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.