दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By admin | Published: June 13, 2016 05:10 AM2016-06-13T05:10:12+5:302016-06-13T05:10:12+5:30

दोन अल्पवयीन मुलींना मोबाइल फोनवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना ठाण्यात घडली.

Torture on two minor girls | दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Next


ठाणे : दोन अल्पवयीन मुलींना मोबाइल फोनवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना ठाण्यात घडली. या दोन्ही घटना एका परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीला शनिवारी रात्री अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.
अंबिकानगर येथील पवन जाधव (२०) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वडापाव गाडीवर काम करणाऱ्या पवन याने त्याच परिसरात राहणाऱ्या ९ वर्षीय आणि ६ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींना मोबाइल फोन गेम खेळण्यासाठी देतो सांगून त्याच परिसरात एका घरात नेऊन अत्याचार केला. तसेच दमदाटी करून धमकी दिली. हा प्रकार ७ जून रोजी घडला. पीडित मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पवनला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केल्यावर त्याला १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.डी. गवते पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Torture on two minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.