तृतीयपंथींकडून मूकबधिर मुलावर अत्याचार

By admin | Published: August 30, 2016 05:29 AM2016-08-30T05:29:30+5:302016-08-30T05:29:30+5:30

फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका १७ वर्षाच्या मूकबधिर मुलावर तृतीयपंथींकडून शारीरिक अत्याचार करण्याची खळबळजनक घटना कुर्ल्यातील नेहरूनगर परिसरात उघडकीस आली आहे.

Tortured child abuse | तृतीयपंथींकडून मूकबधिर मुलावर अत्याचार

तृतीयपंथींकडून मूकबधिर मुलावर अत्याचार

Next

मुंबई : फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका १७ वर्षाच्या मूकबधिर मुलावर तृतीयपंथींकडून शारीरिक अत्याचार करण्याची खळबळजनक घटना कुर्ल्यातील नेहरूनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी गणेश नावाच्या एका ‘गे’ला अटक केली असून तो अन्य मित्रासमवेत गेल्या वर्षभरापासून अत्याचार करीत असल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी दिली असल्याचे नेहरूनगर पोलिसांकडून सांगण्यात आले.
पीडित मुलगा हा कुर्ल्यातील वत्सलानगरात पालकासमवेत राहतो. त्याचे आईवडील एका चप्पल बनविण्याच्या कारखान्यात काम करतात. मूकबधिर असल्याने त्याला घरीच ठेवून जात. गेल्या चार-पाच दिवसांपासून तो अस्वस्थ दिसत असल्याने पालकांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली. आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याने दुखत असल्याचे खाणाखुणा करीत सांगितले. त्याच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात नेऊन त्याबाबत तक्रार दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश नावाच्या तरुणाला अटक केली असून
त्याच्या अन्य साथीदारांचा शोध
सुरू आहे.
मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. बोलता येत असल्याने त्याच्याकडून माहिती घेण्यात अडचण येत आहे. सर्व शक्यता पडताळून तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोपर्डे यांनी सांगितले.


तृतीयपंथींनी अनेक वेळा आपल्या मुलाला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला असल्याचे त्याच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून त्याला तृतीयपंथी बनविण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यामुळे संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Tortured child abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.