मुंबई विमानतळावर तब्बल 36 कोटींचं कोकेन जप्त
By admin | Published: June 11, 2017 04:32 PM2017-06-11T16:32:28+5:302017-06-11T16:32:28+5:30
मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तब्बल 6 किलोचं कोकेन जप्त केलं आहे. लॅपटॉपच्या आतमध्ये कोकेन लपवून तस्करी केली जात होती.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुंबई विमानतळावर रविवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तब्बल 6 किलोचं कोकेन जप्त केलं आहे. लॅपटॉपच्या आतमध्ये कोकेन लपवून तस्करी केली जात होती. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत तब्बल 36 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी एका तस्कराला अटक करण्यात आलं असून फ्रेडी अन्ड्रेस असं त्याचं नाव आहे.
कोकेनची तस्करी होणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाल्यानंतर सापळा रचून या तस्कराला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या लॅपटॉपची तपासणी केल्यानंतर त्यात 12 पाकिटांमध्ये कोकेन लपवल्याचं समोर आलं.
हे कोकेन नेमकी कोणाला देण्यात येणार होतं याचा पोलीस तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.