गाईला स्पर्श केल्यानं नकारात्मकता दूर होते, यशोमती ठाकूरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 08:36 AM2020-01-13T08:36:28+5:302020-01-13T08:39:41+5:30
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांनी अजब दावा केला आहे.
अमरावतीः उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांनी अजब दावा केला आहे. गायीला स्पर्श केल्यानं नकारात्मकता दूर होते, असं त्या म्हणाल्या आहेत. यशोमती ठाकूरांच्या या विधानानंतर वाद उद्भवण्याची शक्यता आहे. तिवश्याच्या आमदार आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये महिला आणि बालकल्याणमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर या अमरावतीतल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
आमची संस्कृती सांगते की, जर आपण गाईला स्पर्श केला तर सर्वच नकारात्मकता दूर होते. गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे एक वादग्रस्त विधान केलं होतं. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. तसेच लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे प्रचारसभेत त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्या विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. त्यानंतर या सर्व प्रकारावर त्यांनी खुलासाही केला होता.
Maharashtra Minister & Congress leader Yashomati Thakur in Amravati: Watching or touching cows drives away the negativity in us. It has been taught in our culture but we often forget. (11.01.20) pic.twitter.com/xpVJUsiOR7
— ANI (@ANI) January 13, 2020
'लक्ष्मीला नाकारु नका' सल्ल्यावरुन यशोमती ठाकूरांवर निरुपम भडकले
माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लक्ष्मीला नाकारू नका, असे वक्तव्य केले होते. मी केवळ त्याची आठवण करून दिली. त्यांचेच ते वाक्य होते. आता मात्र विरोधकांनी त्याच वाक्यावरून ट्रोल करायला सुरूवात केली आहे, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी विरोधकांवरही पलटवार केला होता.
लक्ष्मी आली तर येऊ द्या, नाही म्हणू नका - यशोमती ठाकूर