राष्ट्रवादीसमोर खडतर आव्हान

By admin | Published: September 30, 2014 01:22 AM2014-09-30T01:22:36+5:302014-09-30T01:22:36+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1क् जून 1999 रोजी झाली. त्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

A tough challenge before NCP | राष्ट्रवादीसमोर खडतर आव्हान

राष्ट्रवादीसमोर खडतर आव्हान

Next
>राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापना महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1क् जून 1999 रोजी झाली. त्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून गेली पंधरा वर्षे या पक्षाचा प्रवास सुरू आहे. कॉँग्रेस पक्षात अखिल भारतीय स्तरावर नेतृत्व करण्याच्या मुद्दय़ावरून शरद पवार आणि त्यांचे  साथीदार पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना केली. 
 
अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाल्यानंतर या तिघांनी त्यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून विरोध केला होता. त्यावरून  कॉँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीला महाराष्ट्रात बळ मिळाले; पण अन्यत्र या मुद्दय़ावरून शरद पवारांना पाठिंबा मिळाला नाही. मात्र, अनेक विरोधी पक्षांनी परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून सोनिया गांधींना विरोध केला. 
राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ऑक्टोबर 1999 मध्ये लोकसभा तसेच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत केवळ विदेशी मुद्दय़ावरून राष्ट्रवादीने  इंदिरा कॉँग्रेसला विरोध केला. स्वतंत्रपणो निवडणूक लढविली; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. विधानसभेच्या 223 जागा लढवूनही केवळ 58 जागा जिंकता आल्या. या पक्षाला 22.6क् टक्के मते मिळाली. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने ज्या कॉँग्रेस पक्षाला विदेशी मुद्दय़ावरून विरोध केला होता, त्याच पक्षाबरोबर आघाडी करावी लागली. कॉँग्रेस पक्षाने 75 जागा जिंकल्या होत्या. या दोन्ही पक्षांनी आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात सत्ता मिळविली. तेव्हापासून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार गेली 15 वर्षे महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला महाराष्ट्र व्यतिरक्त इतर कोणत्याही राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभेला केवळ नऊ जागा मिळाल्या होत्या. मात्र, चार राज्यांत किमान सहा टक्के मते मिळविण्यात यशस्वी झाल्याने निवडणूक आयोगाकडे या पक्षाची नोंदणी राष्ट्रीय पक्ष म्हणून झाली.  2क्क्4 आणि 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकाही राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसने आघाडी करून लढविल्या. पहिल्या निवडणुकीत (2क्क्4) राष्ट्रवादीने 124 जागा लढवून 18.75 टक्के मते घेत 71 जागा जिंकल्या. याउलट कॉँग्रेसला 157 पैकी 69 जागा मिळाल्या. ज्या पक्षाला अधिक जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री या न्यायानुसार राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद चालून आले होते. मात्र, ते नाकारून राष्ट्रवादीने दोन जादा कॅबिनेट मंत्रिपदे घेतली. 2क्क्9 च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉँग्रेसने आघाडी करून 113 जागा लढवत 62 जागा जिंकल्या. पुन्हा आघाडीचे सरकार सत्तेवर आले. 2क्1क् मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर आरुढ झाल्यानंतर त्यांच्यावरील सिंचनासंबंधीच्या आरोपाच्या संधीचा लाभ घेत वारंवार राष्ट्रवादी कॉँग्रेसला लक्ष्य बनविले आहे.मात्र, प्रत्येक निवडणुकीत आपला प्रभाव कायम ठेवणा:या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रतिमेला धक्का निश्चित बसला. शिवाय अजित पवार यांचे नेतृत्व वादग्रस्त बनले. त्यातही अंतर्गत गटबाजीने वारंवार डोके वर काढल्याने ग्रामीण भागातील काही प्रभावी नेते पक्षांपासून बाजूला गेले. यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळलेली आहे. परिणामी मतदारांची नाराजी दूर करणो, पक्षाची स्वच्छ प्रतिमा ठसविणो यांसह अनेक आव्हाने या पक्षासमोर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा 1999 सारखी परिस्थिती नसताना राष्ट्रवादी कॉँग्रेसला ही निवडणूक म्हणजे खडतर संघर्ष असणार आहे. 
 
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीवरून कॉँग्रेसबरोबर आणि विशेषकरून मुख्यमंत्र्यांबरोबर सुप्तपणो संघर्ष होत राहिला. या संघर्षाचा केंद्रबिंदू सिंचन योजना होता. अजित पवार यांनी अनेक वर्षे जलसंपदा तसेच अर्थमंत्रिपद सांभाळले होते; पण सिंचनावर होत असलेला खर्च आणि अपेक्षित सिंचन यावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही चौकशीची भूमिका घेतल्याने दोन्ही कॉँग्रेसमधील तणाव अधिकच वाढला. अजित पवार यांचे वर्तन आणि वक्तव्य यावरूनही नाराजीत भर पडली. परिणामी कार्यकत्र्याचे मोठे जाळे, नेत्यांची मोठी फौज, सहकारी संस्थांचे पाठबळ आणि अनुभवी राजकारणी शरद पवार यांचे नेतृत्व या जमेच्या बाजू असूनही राष्ट्रवादी कॉँग्रेस बॅकफुटवर गेली आहे.
 
सुप्रिया सुळे : शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी युवतींचे चांगले संघटन उभे केले आहे. बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला व युवतींना रोजगार मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ‘राष्ट्रवादी युवती काँग्रेस’च्या 3क् हजारांपेक्षा अधिक महिला सभासद झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख संघटक म्हणून त्या काम पाहत आहेत. या पक्षाने सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केले होते. 
 
अजित पवार 
आक्रमक नेतृत्व, उत्तम संघटन कौशल्य आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता यासाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत. पूर्वी राष्ट्रवादीचा दबदबा नसलेल्या भागांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. ते 2क्1क् पासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, कृषी, सिंचन या खात्यांची जबाबदारी पार पाडली. शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतील सर्वात प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते; मात्र कथित सिंचन घोटाळा प्रकणावरून त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे.
 
प्रफुल्ल पटेल
राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्यानंतर केंद्रातील राष्ट्रवादीचे दुसरे प्रमुख नेते म्हणून प्रफुल्ल पटेल हे प्रसिद्ध आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने बॅकफूटवर गेले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग असतो. पक्षाचे धोरण, अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात पटेल यांचा मोठा सहभाग असतो.
 
हेमंत टकले : पक्षाची तिजोरी सांभाळणारे खजिनदार आहेत. पडद्यामागील सूत्रधार अशी ओळख असलेले हेमंत टकले पक्षात प्रभावशाली संघटक आहेत.
 
छगन भुजबळ : ओबीसी समाजातील प्रभावशाली नेते. शिवसेनेच्या मुशीत तयार झालेल्या भुजबळ यांची ओळख धडाडीचा नेता अशी आहे. उत्तम संघटन कौशल्य, मिश्कील वक्तृत्व आणि धडाडीमुळे पक्षात त्यांचे चांगले वजन आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे प्रतिमा काहीशी डागाळली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांचा फार मोठय़ा फरकाने पराभव झाला. नाशिक जिल्ह्यावर भुजबळ यांचा एकछत्री अंमल या पराभवाने संपुष्टात आला. या पराभवानंतरही भुजबळ येवला मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत.
 
आर. आर. पाटील 
राष्ट्रवादीच्या प्रमुख चेह:यांपैकी एक म्हणजे आर. आर. पाटील हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पट्टीचे वक्ते आणि मवाळ स्वभावामुळे ते परिचित आहेत. निवडणुकांमध्ये गर्दी जमविणारा हुकमी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना जिल्हा परिषदेचे सदस्य ते उपमुख्यमंत्रिपद असा त्यांचा राजकीय प्रवास. ग्रामस्वच्छता अभियान, आणि तंटामुक्ती अभियानामुळे ग्रामीण भागात लोकप्रिय.
 
सुनील तटकरे 
सध्या ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमध्ये राष्ट्रवादी पक्षाची मोठी बांधणी केली. सुरुवातीपासून पक्षात एकनिष्ठ राहिलेले तटकरे हे अजित पवार यांचे निष्ठावंत सहकारी आहेत. श्रीवर्धन हा त्यांचा मतदारसंघ. सुनील तटकरे यांनी जलसंपदा, अन्न, नागरी पुरवठा, अर्थ आणि ऊर्जामंत्री ही पदे भूषविली आहेत. 
 
मधुकर पिचड 
आदिवासी समाजातून आलेले पिचड हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. अकोले (जि. नगर) विधानसभा मतदारसंघातून ते सातत्याने निवडून येतात. चार वर्षे त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. राष्ट्रवादीचा आदिवासी चेहरा अशीच त्यांची ओळख आहे. मात्र, या निवडणुकीत त्यांनी आपले चिरंजीव वैभव यांना उमेदवारी दिली आहे.
 
गणोश नाईक 
ठाणो जिल्ह्यातील मातब्बर नेते. ठाणो आणि नवी मुंबईवर त्यांचे वर्चस्व आहे. नवी मुंबई महापालिकेवर त्यांचा एकछत्री अंमल आहे. मुंबई आणि ठाणो जिल्ह्यांत राष्ट्रवादीचा प्रभावशाली नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणो येथून राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. 
 
जयंत पाटील : राज्याचे अर्थमंत्री म्हणून नऊ वर्षे उत्तम कामगिरी. गेली पाच वर्षे ग्रामीण विकास मंत्रिपदी असताना इको-व्हिलेज, तसेच ई-प्रशासन राबविणो प्रभावी सहभाग. सहकारी साखर कारखानदारीचा मोठा अनुभव. तसेच शिक्षण क्षेत्रतही उत्तम कामगिरी. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा पराभव करण्यात मात्र त्यांना अपयश आले.
 
जितेंद्र आव्हाड : ठाणो जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रभावी आमदार. वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून अलीकडेच मंत्रिमंडळात सहभाग. उत्तम वक्ता आणि प्रवक्ता. अनेक राज्य आणि राष्ट्रीय प्रश्नांवरील चर्चेत सहभाग. 
 
लेखाजोखा वसंत भोसले
 

Web Title: A tough challenge before NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.