झरीत माकपा व भाजपाच्या दोन गटांत तुंबळ दगडफेक

By admin | Published: July 13, 2017 03:37 AM2017-07-13T03:37:02+5:302017-07-13T03:37:02+5:30

कम्युनिस्ट पक्ष व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ दगडफेक होऊन दोन्ही बाजू कडील १० घराचे व दुकानाचे नुकसान झाले

Tough stone scam in CPI (M) and BJP's two groups | झरीत माकपा व भाजपाच्या दोन गटांत तुंबळ दगडफेक

झरीत माकपा व भाजपाच्या दोन गटांत तुंबळ दगडफेक

Next

सुरेश काटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : तालुक्यातील झरी धांगडपाडा येथे सोमवारी रात्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुंबळ दगडफेक होऊन दोन्ही बाजू कडील १० घराचे व दुकानाचे नुकसान झाले या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला दोन्ही गटाने तक्र ारी दाखल केल्या आहेत.
सोमवारी दुपारी माकपाच्यावतीने झरी ग्रामपंचायतीवर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला याच वेळी झरी मध्ये भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, झरी ग्रामपंचायत ही सध्या भाजपच्या ताब्यात आहे, मोर्चाच्या वेळी भाजपा व माकपाच्या कार्यकर्त्यांत जोरदार शाब्दिक चकमक झडली. तिचे पर्यावसन रात्रीच्या दगडफेकीत झाले यात माकपचे महेश वाज्या वळवी, रमण धांगडा, शैलेश पाचलकर, विलास पाचलकर, प्रशांत धांगडा कमलाकर धांगडा, विष्णू धांगडा, वाज्या पाचलकर यांच्या घरावर दगडफेक झाली. तसेच त्यांच्या मोटारसायकलचे नुकसान करण्यात आले. तर भाजपचे सुरेश मेढा, अरविंद भावर यांच्या घरांचे नुकसान झाले याबाबत माकपचे महेश वळवी यांनी विनोद मेढा (भाजप अध्यक्ष), प्रवीण मेढा, अरविंद भावर (सरपंच झरी) व इतर बारा तेरा जणांनी दगड व दांडक्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली तर भाजपचे अरविंद सदू भावर यांनी महेश वळवी, शंकर गोवारी, सुनील धांगडा, कमलाकर धांगडा व इतर ८० ते १३० लोकांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली बाचाबाचीची दखल पोलिसांनी घेऊन झरी येथे बंदोबस्त ठेवला असता तर रात्री चा राडा टाळता आला असता अनेक वर्षांपासून ही ग्रा.पं. माकपाच्या ताब्यात होती ती भाजपने हिरावून घेतली आहे.

Web Title: Tough stone scam in CPI (M) and BJP's two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.