महाराष्ट्र एमटीडीसीने सादर केले पर्यटन पर्व, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 05:48 PM2017-10-06T17:48:10+5:302017-10-06T17:55:34+5:30

 ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पर्यटनातर्फे पर्यटन पर्व साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध  ठिकाणी अनेकविध प्रकारचे उपक्रम, निबंध स्पर्धेसारख्या स्पर्धा, माय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी ही चित्रपट स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आणि प्रवासातील अनुभव शेअर करण्याबाबतची कार्यशाळा, चित्रकला, हस्तकला  प्रदर्शन  आणि  सांस्कृतिक  कार्यक्रमांची  रेलचेल  असणार आहे.

Tourism, painting, handicraft exhibition and cultural events presented by Maharashtra MTDC | महाराष्ट्र एमटीडीसीने सादर केले पर्यटन पर्व, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल 

महाराष्ट्र एमटीडीसीने सादर केले पर्यटन पर्व, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल 

Next

मुंबई- ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पर्यटनातर्फे पर्यटन पर्व साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध  ठिकाणी अनेकविध प्रकारचे उपक्रम, निबंध स्पर्धेसारख्या स्पर्धा, माय बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी ही चित्रपट स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आणि प्रवासातील अनुभव शेअर करण्याबाबतची कार्यशाळा, चित्रकला, हस्तकला  प्रदर्शन  आणि  सांस्कृतिक  कार्यक्रमांची  रेलचेल  असणार आहे. महाराष्ट्राचे  सन्माननीय  पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पर्यटन पर्व उपक्रमाचे  उद्घाटन  करण्यात  आले.  या वेळी महाराष्ट्राचे  सन्माननीय  पर्यटन  राज्यमंत्री  मदन येरावार आणि पर्यटन व सांस्कृतिकखात्याचे प्रधान सचिव (आयएएस) नितीनगद्रे, एमटीडीसीचे संचालक (आयएएस). विजय वाघमारे  आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन पर्व हा एकवीस दिवसांचा उपक्रम आहे.पर्यटन केंद्रस्थानी आणण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट  आहे. 'सर्वांसाठी  पर्यटन'  ही या मागची संकल्पना असून या माध्यमातून सहल आयोजक,  हॉटेलचालक,  रिसॉर्ट चालक आणि इतर  संलग्न  व्यवसायांना  महाराष्ट्रातील  पर्यटनक्षेत्रात  योगदान देण्यास सक्षम करावे या याउपक्रमाचा होतू आहे. या आधी भारताचे सन्माननीय  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आपल्या  'मन की बात'  या उपक्रमात नागरिकांना आपापल्या राज्यातील पर्यटन स्थळे आणि मग राज्यातील पर्यटन स्थळांचा अनुभव घेण्याची  विनंती  केली  होती.  देशातील विविध ठिकाणांमध्ये  असलेल्या  वैशिष्ट्यांची  प्रवाशांनी काढलेली छायाचित्रे पर्यटन खात्यातर्फे मागविण्यात आली आहे. या वेळी  बोलताना महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यटनमंत्री  जयकुमार रावल  म्हणाले, "पर्यटन पर्व या उपक्रमात  सहभागी होताना आम्हाला अत्यंत  आनंद होत आहे. भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागरिकांना या देशातील वैविध्यपूर्ण सौंदर्याचा  आस्वाद घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.  या ठिकाणी येणारे पाहुणे  महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा, खाद्यसंस्कृती आणि पोशाख यांचा अभ्यास करू शकतात, ज्यामुळे पर्यटन विभागाला नवनवीन आणि उदयोन्मुख पर्यटन स्थळांचा प्रसार करण्यास सहकार्य मिळेल.

 

या प्रसंगी एमटीडीसीचे संचालकविजय वाघमारे म्हणाले,"राज्याचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आणिसौंदर्याच्या खजिन्याचा अनुभव घेण्यासाठीपर्यटन पर्व ही प्रवाशांसाठी अप्रतिम संधी आहे.दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करणारेअनेक कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फेआयोजित करण्यात आले आहेत. आमच्याविभागाशी अनेक संबंधित घटक जोडले जातआहे आणि त्यांनी अनेक रोमांचक ऑफर्स देऊकेल्या आहेत. हे पर्यटन पर्व संस्मरणीयकरण्यासाठी इच्छुक संबंधित घटकांनी, सहलआयोजकांनी  पुढे यावे आणि एमटीडीसीच्यासहकार्याने त्यांची पॅकेजेस देऊ करावीत, असेआवाहन एमटीडीसीतर्फे करण्यात येत आहे." 

या वेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड म्हणाले,"५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या पर्यटन पर्वाच्या निमित्ताने जगभरातील पर्यटकांना आकर्षित  करणारे  आमचे अथांग समुद्रकिनारे,  थंड हवेची ठिकाणे,  अभयारण्ये, नैसर्गिक गुहा,  धबधबे  इथपासून ते विशाल गडकिल्ले, रंगीबेरंगी उत्सव यांचे दर्शन घडविण्याबाबत आम्ही अत्यंत उत्साहित आहोत.  महाराष्ट्रात सागरी पर्यटन, कृषी पर्यटन, वन्य पर्यटन,  बॉलीवूड पर्यटन, क्रूझ पर्यटन, खाण पर्यटन, कॅराव्हॅन पर्यटन, वेलनेस पर्यटन आणि माइस यासारखे विविध पर्यटन पर्यटन पर्याय उपलब्ध करून देण्यात येतात.  महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि शिर्डी हे पाच प्रमुख विमानतळ आहेत.  या विमानतळांच्या माध्यमातून भारतातील आणि जगभरातील विविध प्रमुख शहरे जोडली गेली आहेत."


 

Web Title: Tourism, painting, handicraft exhibition and cultural events presented by Maharashtra MTDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.